भोपाळ वायू दुर्घटना आणि खोटा प्रचार
भोपाळ वायु दुर्घटना आणि चोर चौकीदाराचा खोटा प्रचार ..
राजीव गांधी यांनी भोपाळ वायु दुर्घटनेतील आरोपी वॉरन अँडरसनला भारताबाहेर जाऊ दिले कारण, नेताजी बोस यांच्या मृत्यूबद्दल नेहरूंविरोधात असल्याची माहीती महमंद युनूस यांच्याकडे होती म्हणे! महमंद युनूस हे नेहरूंचे निकटवर्तीय होते,त्यांना नेताजीच्या कथित घातपातात नेहरूंचा हात असल्याची माहिती होती आणि त्यांचा मुलगा अदिल शहरयार अमेरिकेच्या तुरूंगात होता. त्याची सुटका करा अन्यथा मी नेहरूंच्या बोस यांच्या कथित घातापाताची माहीती खूली करेन अशी धमकी युनूस यांनी दिली.म्हणून राजीव गांधींनी रेगन यांनी माफी दिली व त्या मोबदल्यात वॉरन अँडरसनला भारताबाहेर जाऊ दिले, असे दिवंगत माजी केंद्रीय गृहमंत्री अर्जून सिंग यांनी त्यांच्या ' A grain of Sand in the hourglass of time ' या त्यांच्या आत्मचरित्रात केल्याचे अनुज धर यांचे संशोधन आहे, अशी विचित्र पोस्ट सध्या भाजपाकडून फिरवली जात आहे.
अर्जून सिंग यांच्या 'A grain of Sand in the hourglass of time'या आत्मचरित्रात, प्रकरण क्र 21 मधे पान क्र 171 ते 182 दरम्यान त्यांनी 'The Bhopal Gas Tragedy' बद्दल लिहीले असून त्यांचे 11 अॉगस्ट 2010 रोजीचे संसदेतील निवेदन पान क्र.381 ते 390 या दरम्यान मांडले आहे. त्यात कुठेही महमंद यूुसन, अदिल शहरयार आणि अगदी अमेरिकी राष्ट्रपती रेगनचा आजीबात उल्लेख नाही. विशेष म्हणजे राजीव गांधींनीही याबाबत कांही बोलल्याचाही आजीबात उल्लेख नाही. कांही सत्य घटना आणि भरपुर खोट्या बाबी, ज्या केवळ कल्पनाशक्तीच्या आधारे मांडून नेताजींचा कथित घातपात आणि नेहरूंची बदनामा करणा-या अनुज धरच्या सुपीक डोक्यातील धादांत खोट्या बाबींच्या आधारे 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर राजीव गांधी यांची व कॉग्रेसची बदनामी करणे हाच या मोदी भक्तांचा हा वाह्यात प्रयत्न आहे.
युनीयन कार्बाईडचे सीईओ सन 2014 साली वारले, सन 1998 पासून 2004 पर्यंत भाजपा सरकारच्या काळात वॉरन यांना भारतात आणण्यासाठी काय प्रयत्न केले? अरूण जेटलींनी वॉरन अँडरसन हे भोपाळच्या फँक्टरीतील विषारी वायूच्या लिकेजच्या अपघातास जवाबदार धरले जाऊ शकत नाहीत आणि तशी भारताची केसही नाही असे स्पष्टपणे 2001 सालीच म्हटले होते.अगदी असेच मत वाजपेयींच्या सरकारचे अटॉर्नी जनरलच सोली सोराबजी यांचे होते. याबद्दल अनुज धर आणि भक्त गप्प का आहेत. मुळात रेगन यांनी अदिल शहरयारला माफी देणे आणि त्याचा बादरायण सबंध वॉरन अँडरसनच्या पळून जाण्याशी लावणे हा धादांत खोटेपणा आहे. दाओसला मोदी सोबत असणाऱे निरव मोदी अरूण जेटलींशी संसदेच्या व-हांड्यात भेटून भारतातून सुखरूप पळून जातात, ' हमारे मेहूल भाई' म्हणून मोदी ज्यांचा उल्लेख करतात ते मेहूल चौकसी ही भारतातून पसार होतात आणि सुषमा स्वराज ज्यांना मानवीय मदत करतात ते ललित मोदीही विदेशात सुखनैव राहतात, एवढे सर्व असून अनुज धर यांना मात्र नेताजींच्या सर्व फायली नरेंद्र मोदींनी जनतेसमोर खुल्या करूनही पुन्हा नेताजींचा घातपात झाल्याचा कांगावा करून त्यामुळे राजीव गांधींनी, महमंद युनूसच्या धमकीस घाबरून त्यांचा मुलगा अदिलच्या सुटकेसाठी, वॉरन अँडरसनला भारताबाहेर जाऊ दिल्याचा आरोप करतात, याचा कुठेही सबंध लागत नाही कारण हे सर्व आरोप मनघडंत आहेत, तद्दन खोटे आहेत.
राजीव गांधी खरंतर अपघाताने पंतप्रधान बनले! इंदिराजींची हत्या 31 अॉक्टोबर 1984 ला झाली. त्यानंतर अवघ्या एक महिना दोन दिवसांनी ही 2 डिसेंबर 1984 ला भोपाळ वायु दुर्घटना घडली. या महिनाभरात तर राजीव गांधी वैयक्तिक प्रशासकीय कामात कितपत सहभागी असतील याचा विचार सुज्ञ व्यक्ती करू शकतो. पंतप्रधान म्हणून जवाबदारी त्यांच्यावरच असली तरी बहुतांश कारभार हा सचीव पातळीवरच चालू होता. तेंव्हा अँडरसनच्या भारतातून जाण्यास जवाबदार धरायचेच असेल तर प्रशासनासह धरता येईलही एकवेळ, पण त्यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यामागे नक्कीच दुर्हेतू आहे, हे स्पष्ट आहे. विषेश म्हणजे त्याकाळात भारताची आंतरराष्ट्रीय पातीऴीवर असणारी स्थिती आणि अमेरीकन दबावही पाहणेही महत्वाचे आहे. वॉरन अँडरसन हे रिगन प्रशासनाचे निकटवर्तीय होते. त्यामुळे दुर्घटनेसाठी प्रत्यक्ष जवाबदार नसताना अमेरिकन नागरिकाला भारतात अडकवून ठेवू नये असा दबाव रेगन प्रशासनाने आणला होता काय? हा प्रश्न आहे मात्र याचा सबंध अदील शहरयार, महमंद युनूस, नेताजी बोस, नेहरू असा लावणे धादांत खोटे आहे. शिवाय जेव्हा हा विषय ताजा होता तेंव्हाही कोणी त्यांच्यावर असे आरोप केले नाहीत. विशेष म्हणजे याच डिसेंबर महिन्यात 24 ते 27 डिसेंबर 1984 रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यातही भाजपाच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला नाही. कारण वॉरन अँडरसन, केशुब महिंद्रा आणि विजय गोखले यांना न्यायालयाकडून जामीन 17 डिसेबर 1984 पुर्वीच मिळाला होता. त्यापैकी वॉरन अँडरसन निरव मोदी, मेहूल चौकसी प्रमाणे भारताबाहेर गेले! आता अँडरसन बाहेर जाण्यास राजीव गांधींना जो जवाबदार धरतात त्यांनी निरव मोदी आणि मेहूल चौकसी यांनी पळून जाण्यास नरेंद्र मोदी जवाबदार आहेत, हे उघडपणे मान्य करायला हवे! राजीव गांधी तर आज हयात नाहीत, त्यामुळे ते उत्तर देऊ शकत नाहीत पण जे हयात आहेत, त्यांना उत्तर देण्यास भाग पाडण्याची जवाबदारी राजीव गांधीवर आरोप करणा-यांची नक्कीच आहे!
मुळात युनीयन कार्बाईडच्या जंतुनाशक बनविण्याच्या कारखान्याची निर्मिती 1969 ला झाली.त्यावेळी जंतुनाशक बनविण्यासाठी उपयोगी असणारे मिथील आयसोसायनेट हे विदेशात बनवले जात होते परंतु त्यांना हे भारतात बनविण्याची परवानगी 1979 साली जनता पार्टींच्या सरकारच्या दिली गेली हे विशेष! शिवाय या संपुर्ण प्रकरणात पंतप्रधान मोदींचेच लाडके मंत्री अरूण जेटली त्यावेळी काय म्हणतात हे पाहणेही महत्वाचे आहे. आश्चर्यांची बाब अशी की, युनीयन कार्बाईड फँक्टरीचे तत्कालीन संचालक व भोपाळ वायु दुर्घटनेचे आरोपी व 2010 साली दोषी ठरलेले केशुब महिंद्रा यांना भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी सरकार काळात 2002 साली पद्मभुषण देण्याचा पराक्रम केला गेला, मात्र तो त्यांनीच नाकारला!
नरेंद्र मोदी गेली पावने पाच वर्ष सत्तेत आहेत.अनेक आश्वासने जनतेला देवून ते 2014 साली सत्तेत आले आहेत. जनतेने त्यांना त्यांची झोळी भरभरून दिलेले 2014 ला दिले होते. पण अजूनही त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्या भक्तांनी कधी 70 वर्षापुर्वीच्या, तर कधी 25 वर्षापुर्वीच्या घटनांची मोडतोड करून, खोटे बोलून प्रचार करण्याची निकड 2019 च्या निवडणुकीच्या तोंडांवर भासते, यातच त्यांचे अपयश सुर्यप्रकाशाएवढे जाज्वल्य, प्रखर, विशाल आणि विराट दिसत आहे.
इसका एकही मतलब है ...
चौकीदार चोर है
चौकीदार झूठा है
© राज कुलकर्णी
Comments
Post a Comment