आडनावे, पडनावे आणि समाज ..................
दै.प्रजापत्रच्या 'बहुरंग' पुरवणीत काल प्रकाशित झालेला माझा लेख.........
.
आडनावे, पडनावे आणि समाज ..................
'धमाल' या हिंदी चित्रपटात एक विनोदी प्रसंग आहे, अर्षद वारसी आणि जावेद जाफरी यांना गोव्याला जाण्यासाठी लिफ्ट हवी असते. तोच एका दाक्षिणात्य व्यक्तीची गाडी थांबते. ही भूमिका विनय आपटे यांनी साकारली आहे. त्याच्या गाडीत बसल्यावर हे दोघे सहजपणे त्याचे नाव विचारतात आणि तो व्यक्ती त्याचे नाव सांगायला चालू करतो,...“चिन्नास्वामी ,मुत्तुस्वामी वेणू गोपाल अय्यर”! त्याचे नाव ऐकताना जवळपास दक्षिणेतल्या सर्व शहरांची आणि भारतीय आणि श्रीलंकन क्रिकेट खेळाडूंची नावे ऐकून पाहणाऱ्या व्यक्तीची हसून हसून पुरेवाट होते! दाक्षिणात्य अडनावांच्या समजुतीबद्दल असणा-या इतरांच्या अज्ञानातील व्यंग खूप चपखल पणे या प्रसंगात चित्रित केले आहे.
भारतीय समाज व्यवस्थेत सर्वच प्रदेशात कांही ठराविक आडनावे आढळतात. प्रत्येक समाजातील आडनाव म्हणजे कुटुंबाची ओळख असते. विविध प्रदेशातील कांही लोकप्रिय आडनावे आहेत. वर्मा,शर्मा,मल्होत्रा, ही उत्तर भारतीय नावे हिंदी चित्रपटांनी खूप लोकप्रिय केली. बंगाल मध्ये इतर खूप आडनावे असतीलही पण मुखर्जी ,बँनर्जी, चटर्जी, टागोर, बोस,दास, गांगुली हीच आडनावे आठवतात ,गुजरात म्हटले की पटेल, राजस्थान म्हटले की चौहान ,राठोर, सिंह,अशी नावे समोर येतात.
देशातील इतर प्रदेशातील आडनावे आपल्याला प्रादेशिक ओळख सांगतात ,मात्र महाराष्ट्रातील आडनावे महाराष्ट्रीय समाजासाठी थेटपणे जातींची निदर्शक असतात ,कारण ती आपल्या दैंनदिन जीवनाचा भाग म्हणून आपल्या समोर येतात. देशाच्या इतर भागातील लोकांसाठी महाराष्ट्र म्हटले कि पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, भोसले , चव्हाण,पवार,कदम ही नावे चटकन ओठावर येतात.
जात हे भारतीय समाज व्यवस्थेतील वास्तव आहे ,काळाबरोबर जातीच्या भिंती पातळ होत गेल्या तरीही जात ही समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शिल्लक राहिलेली आहे आणि आडनावे ही या जातीच्या ओळखीचे प्रथम दर्शनी प्रतीके आहेत. कारण आडनावामुळे व्यक्तीच्या जातीचा ८०% तरी अंदाज येतोच. पण कांही आडनावे संभ्रमात टाकणारी असतात ,त्यावेळी मात्र आवर्जून लोक,इतर पाहुणे वा नातेवाईक यांची चौकशी करतात.
महाराष्ट्रात अनेकांची आडनावे थेट जातीची नावेच असायची आणि आजही आहेत. म्हणजे सोनार, माळी, साळी,कोष्टी,शिंपी, कासार, अशीच आडनावे आहेत. महसुली दस्तऐवज पाहताना कांही नावे धनगर, लमाण,पारधी अशीच आढळतात. मात्र याच दस्तऐवजात ब्राह्मण आणि मराठा समाजाच्या नोंदी मात्र आडनाव नसलेल्या आहेत. म्हणजे ‘सन्तु भिवा’ ‘नामा तुका’ ‘रावजी बाळाजी’ या मध्ये आडनावे दिसूनच येत नाहीत. स्वातंत्र्य पूर्व काळातील खरेदीखतात,जिथे आडनाव नाही अश्या वेळी नाव ,वय, पत्ता याबरोबर जात सुद्धा नमूद केली जात असल्याचे दिसून येते. मारवाडी, गुजर, मुसलमान यांचा उल्लेख सुद्धा जात म्हणून केला असल्याचे अनेक खरेदीखत आणि दस्तऐवज पाहायला मिळते आणि समाजाच्या भाषेत तीच त्यांची आडनावे म्हणून वापरली जातात. बंकट मारवाडी, शांतीलाल गुजर , मुस्तफा मुसलमान अशी कितीतरी नावे सांगता येतील !
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असणाऱ्या मराठा समाजात भोसले, जाधव ,पवार ,कदम ,मोरे , गोरे ,मोहिते ,सूर्यवंशी, निकम,जगदाळे, काळे आदी नावे सर्रास आढळतात.अर्थात ही आडनावे इतर समाजात सुद्धा आढळतात मात्र मराठा समाजात या अडनावांचे प्रमाण जास्त आहे. पाटील,देशमुख ही वतनदार मंडळीची आडनावे त्यांना मिळालेल्या वतनामुळे पडलेली आहेत. त्यात आता माने-पाटील ,काळे-पाटील, जाधव- पाटील किंवा माने-देशमुख , काळे-देशमुख या आडनावांची भर त्यात पडली आहे. मराठा समाजाची ९६ कुळे मानली मानली जातात . त्यात ९६ अडनावांचा समवेश आहे. या नावासोबतच अनेक ठिकाणी कांही पडनावे पाहायला मिळतात, ठराविक परिस्थितीत किंवा एखाद्या घराण्याच्या विशिष्ट कांही कर्तृत्वामुळे मिळालेली असतात. या पडनावांचा पसारा प्रचंड मोठा असून ती समाजातील अनेक घडामोडींचे ,घटनेचे, वस्तूंचे प्रतिक आहेत. पशु पक्ष्यावरून गरुड ,सासणे, कावळे ,वाघ ,साळुंखे, चिमणे, डुकरे, कोल्हे, लांडगे पुन्हा या प्राण्यांना मारले तर वाघमारे, हरणमारे अशी देखील नावे आढळतात. अन्न धान्यावरून तेले ,तुपे, दुधे, दुधभाते, ताकभाते, तांदळे ,गव्हुदले, भातभागे, कांदे, लसणे, मुळे, गाजरे, मोहरे, वांगे, गवांरे, भोपळे, मसुरे, तुरे ,हरभरे. मानवी अवयवावरून काने, तोंडे, हनुवटे, कपाळे ,पोटे, खांदे, बोटे,एकबोटे, कोपरे अगदी भांडे, तांबे, ताटे, वाडगे अशी भांडया वरून नावे तर लोखंडे, सोन्ने, चांदे, अशी धातूंची नावे देखील आढळतात.
ब्राह्मण समाजाची अगदी टिपिकल आडनावे म्हणजे कुलकर्णी,जोशी,देशपांडे,आचार्य! पण ही झाली देशस्थांची अडनावे! आपटे , लिमये,चितळे, गोखले ही चित्पावन ब्राह्मणांची आडनावे! ही टिपिकल नावे सोडली तर ब्राह्मण समाजात देखील इतर समाजाप्रमाणे विविध नावे आढळतात. त्यात पाटील ,देशमुख ही आडनावे ब्राह्मण आणि मराठा या दोन्ही समाजात आढळतात, शिवाय मुस्लीम समाजात सुद्धा ही आडनावे आढळतात. जहागीरदार आणि इनामदार ही आडनावे ब्राह्मण आणि मुस्लीम समाजात आढळतात, कारण ही आडनावे वतन,इनाम, जहागिरी मिळाल्यानंतर पडलेली आहेत.
देशात १९७२ सालच्या दुष्काळानंतर समाजात खूप बदल घडले. महाराष्ट्रात तर खूप मोठ्या प्रमाणावर हे बदल घडून आले कारण या दुष्काळानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यातून ब्राह्मण आणि दलित समाजाचे मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर झाले. या दोन्ही वर्गांनी गावातील पारंपारिक व्यवसाय सोडले आणि साधारणपणे १९७०-७५ दरम्यान शहरी भागत वास्तव्यास आले. यावेळी मराठा समाज आणि इतर समाज मात्र गावातच राहिला कारण त्यांची उपजीविका थेट शेतीवर आधारलेली होती. ब्राह्मण आणि दलित यांचा सबंध थेटपणे शेतीतील श्रमाशी नव्हता आणि त्यामुळे ब्राह्मण आणि दलितांनी शहरात येवून उच्च शिक्षण घ्यायला शुरुवात केली. हे दोन्ही वर्ग न्यूनगंडाने बाधित झालेले होते, एकवर्ग बदललेल्या समाजकारण आणि राजकारणामुळं अस्वस्थ होता तर दुसरा उपेक्षेने अस्वस्थ होता. दोघेही आपली जुनी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या नावातून आणि अडनावातून करू लागले. ब्राह्मणांना नावे बदलण्याचा विषय नव्हता ,मात्र आडनावे बदलण्यास सुरुवात झाली. अर्थात हेच याचे एकमेव कारण नव्हे, अनेक कारणे आहेत. ब्राह्मण समाज ज्या गावातून आला ,त्या गावावर त्यांची आडनावे सुरु झाली. अर्थात ही प्रक्रीया पुणे, मुंबई नाशिक भागात स्वातंत्र्यपुर्व काळातच सुरू झाली होती, अविकसीत भागात उशीरा सुरू झाली. गावाचे नाव आणि पुढे ‘कर’ असे सर्रास पाहायला मिळाले. अमुक कुलकर्णी-सांगवीकर , तमुक जोशी-माळूम्ब्रेकर, करंदीकर, वेंगुर्लेकर अशी आडनावे सुरु झाली. हीच नावांची पद्धत थेट जातींवर ज्यांची आडनावे होती त्यांनी देखील सुरु केली. महाराष्ट्रात ‘कर’आडनावाचेअसंख्य लोक आढळतात. चित्रपट , नाट्य, साहित्य या क्षेत्रात अशा करांचे मोठे योगदान आहे. नव्याने शहरात येणाऱ्या दलित समाजाने सुद्धा ‘कर या स्वरुपात नवीन आडनावे लावण्यास सुरुवात केली. कांहींनी गावावरूनच सोलापुरे, कोल्हापुरे ,सुल्तानपुरे अशी सुद्धा आडनावे धारण केली. ज्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला अशा समाजात त्यांच्या व्यवसायावरून आडनावे पडलेली दिसून येतात. खास करून मुंबईत राहणाऱ्या पारशी समाजात बूटवाला, लकडावाला, स्क्रूवाला, बाटलीवाला अशी नावे पाहायला मिळतात.
स्त्रियां आणि अडनावे, यांचा तसा कांहीच सबंध पुर्वी नव्हता! लग्नापुर्वीचा कांहीकाळ सोडला तर त्यांची ओळख त्यांच्या
नव-याहूनच ! मग नव-याचं आडनाव हेच त्यांचे अडनाव! त्या तशा पहिल्या गेल्यातर नेहमीच उपेक्षित राहिलेल्या ,लग्नांनंतर त्यांना आडनाव बदलणे अनिवार्य होते. लग्नानंतर माहेरचे आडनाव लोप होवून जायचे ,परंतु शिक्षण आणि आत्मनिर्भरता यामुळे आलेले भान, यामुळे स्त्रियांना लग्नानंतरही त्यांच्या माहेरचे आडनाव कायम ठेवण्यास प्रेरित केले आणि अनेक महिलांनी यातून सुवर्ण मध्य साधून जोड आडनावे लावायला चालू केली आणि हा ट्रेंड अद्याप चालू राहिला आहे. मात्र पुढे पुढे कुठलेच आडनाव नको अशी अवस्था कांही स्त्रियांची झाली आणि केवळ स्वतःचे नाव आणि त्यापुढे नवऱ्याचे नाव ,एवढ्या समान पातळीवर येण्याची स्थिती निर्माण होवून आडनावे लुप्त होण्याची प्रक्रिया सुरु झाली, जी एका अर्थाने समाजातून जातीयता नष्ट होण्याच्या मार्गावरील एक पाडाव म्हणावी लागेल.
एकविसावे शतक उजाडल्यावर जातीभेद संपतील म्हटले तर उलट जातीय संघटना जास्त वाढल्या. अडनावे पुन्हा अधिक प्रमाणात प्रबळ झाली. कांही ठिकाणी अडनावासोबत आपली जात लोकांना ठळकपणे कळावी म्हणून आडनाव व जात एकत्र सांगण्याता प्रघात सुरू झाला. असे असले तरीही वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या कांही मोजक्या लोकांनी स्वतःचे नाव आणि त्यापुढे केवळ आई वडिलांचे नाव लिहून ,आडनावला फाटा देण्याचा प्रयत्न केला. भारतीय मन पूर्वजांच्या कुटुंबाच्या ,घराण्याच्या आठवणीने भारावून जाणारे आहे, त्यामुळे भारतीयांना कुटूंबाची घराण्याची ओळख असणारी आडनावे प्रिय आहेत. भारतीय समाज जीवनातील हे एक वास्तव आहे. फक्त कुटूंबाच्या व्याख्येत संपुर्ण समाज आपलासा केला आणि घराची कल्पना अधिक व्यापक केली तर हेच वास्तव खरोखरच गौरवाने सांगता येईल.
© राज कुलकर्णी.
Page loaded.
ReplyDeletePress question mark to see shortcut keys available
Nitin Rajeghadge
Public
12 Mar 2018
मनसबदार ,वजिर,जहांगीरदार , संस्थानिक,आणि सरदारांमध्यें घाटगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे . ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडील गेल्या नंतर पंच्यात अवघ्या 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.राठोड राजपुत /, महाराष्ट्रात राष्ट्रकुट/,काळमुख/, निषेद वंश
घराण्याच्या शाखा आहेत..पण राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे , विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
घाटगे उर्फ घाडगे हे नाव कसे पडले ?
सूर्य वंशीय क्षत्रिय घराण्याची एक शाखेचा मुळं षुरूष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमनी कारकिर्दीत गाजवली.फेरिस्ती इतिहास संशोधकांनी म्हटले आहे की
कामराज ह्यापुरूषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्या घाट हा कोलट्या उड्या मारीत तो घाट वाजवला होता अजिंक्य आश्या पराक्रम बेदरच्या व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशुराला तो घाट वाजवता आला नव्हता.आसा तो उंच असलेल्या अजिंक्य घाट ह्या कामराज ह्यापुरूषाने पराक्रम पुर्वक वाजवुन दाखवून दिला. त्यामुळे बादशहा ने खुश होऊन त्यास घाटगे ही पदवी देऊन गौरव तरकेला.आणी उच्च प्रति ची मनसब त्यास बहाल केली.व वंशपरंपरागत" सैन्यात उच्च अधिकारी "असा ,, अधिकार बहाल केला.ह्या कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.
अनेक युध्दात आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता.बहमनी संस्थापक हसन गंगो बामनी ब्राह्मणी बहमनी ह्या बादशहा ने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाची देशगत होती.
मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी लाऊन दीला होता.हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले.
मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांना सहा पुत्र होते.
ह्या सहा पुत्रापासुन महाराष्ट्र देशा तील सर्व घाटगे उर्फ घाडगे
घराने महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभाग ले जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहीमाच्या निमित्ताने दुर दुर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व इंदोर व बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले . असलं तरी सर्वांचा मुळ पुरुष हे मनसबदार कामराज घाटगे(१३६१) यांचे वंशज आहेत.ह्याच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहगिरी वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.कागलचे संस्थान आज ही उभं आहे.छ.शाहु राजेभोसले हे मुळचे घाटगे होय.
घाटगे घराण्याच्या इतिहासात काही गोष्टी लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात घाटगे उर्फ घाडगे घरान्याहुन अधिक उच्च प्रतिचे खानदानी घराने अस्तित्वात नव्हतं.आसे म्हटले जाते.छ.शाहु हे घाटगे घराण्यातुन दत्तक घेण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थाने घेतला होता.
संदभ छं.शाहु ह्या पुस्तकात वरील संदर्भासाठी पाहु शकता.
जैतपाळनाक
बगडनाक
लोकनाक
नयननाक
लोहनाक
परसनाक
ही काम राज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे ह्या सहा मुला पासुन पुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे विस्तार पावले असुन ह्या सर्वांचा मुळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हे होय.
लेखन: नितीन घाडगे (सरकार)
Translate
2 plus ones
2
no shares
Shared publicly•View activity
Kamble surname meaning
ReplyDeleteBhoir surname 96 k jhai kya
ReplyDeleteभांगे
ReplyDelete