चार्ली चँप्लीन, नेहरू आणि हिटलर
चार्ली चँप्लीन, जवाहरलाल नेहरू आणि अडॉल्फ हिटलर
चार्ली चँप्लीन, जवाहरलाल नेहरू आणि अडॉल्फ हिटलर या तिघामध्ये काहीतरी साम्य आहे ,असे म्हटल्यावर अनेकांचे डोळे विस्फारतील ! पण हे सत्य आहे. कारण हे वर्ष या तिघांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्ष आहे. तिघांचाही जन्म एकाच वर्षी म्हणजे १८८९ साली झाला आहे. चार्ली चँप्लीन हा हिटलर पेक्षा केवळ चार दिवसांनी मोठा आहे , चार्ली चा जन्म १६ एप्रिल १८८९ ,तर हिटलर चा २० एप्रिल १८८९ . जवाहरलाल नेहरू १४ नोव्हेंबर १८८९ चे ! म्हणजे जवाहरलाल नेहरू , चार्ली चाप्लीन पेक्षा जवळपास ६ महिने २८ दिवसांनी तर हिटलर पेक्षा ६ महिने २४ दिवसांनी लहान आहेत . वेगवेळ्या देशात, वेगवेगळ्या आर्थीक, सामाजीक आणि राजकीय.परीस्थीत, एकाच वर्षी जन्मलेल्या या तिघांनी २० व्या शतकाच्या जडण घडणीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकला ,तिघांचीही नावे इतिहासात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारी ठरली. नेहरू आणि हिटलर हे राजकीय क्षेत्रातील नेते होते ,तर चार्ली एक मनस्वी कलावंत होता . समान वयाच्या या तिघांनी जगाकडे खूप वेगवेगळ्या नजरेने पहिले, जगाऩेही त्यांना त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीप्रमानेच न्याय दिला . आश्चर्याची बाब अशी कि , चार्ली चा पहिला चित्रपट ' मेकिंग अ लिविंग ' प्रदर्शित झाला १९१४ साली ,त्याच वर्षी हिटलर साल्झबर्ग येथून पुन्हा मुनिच ला परतला होता आणि त्याच वर्षी त्याने पहिल्या पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रियन सैनिक म्हणून कारकीर्द शुरू केली आणि त्याच्या एक वर्ष आधी नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्कांच्या चळवळी साठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली होती . त्यांची आणि गांधी यांची प्रत्यक्ष भेट १९१५ साली झाली ,तो पर्यंत नेहरू यांनी अनी बेझंट यांच्या होमरूल लीग या चळवळी च्या माध्यमातून राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. म्हणजे आपल्या जीवनकार्याची सुरुवात तिघांनी जवळपास एकाच वेळी केली होती .
चार्ली चँप्लीन , हा मनस्वी कलावंत, जागतिक रुपेरी पडदा त्याच्या पडद्यावरील वावरामुळे अफाट विस्तारला आणि मानवी भावनांचे उत्कट चित्रण संवादाशिवाय जगातील मानवजातीशी संवाद साधणारे ठरले. पण हा मनस्वी कलावंत मानवता आणि समस्त मानवजात यांचा विचार करणारा महान तत्वचिंतक आणि विचारवंत होता . म्हणूनच जगाच्या पडद्यावरील महान कलाकार म्हणून जगात चार्ली चे नाव अजरामर आहे. हिटलर आणि चार्ली मध्ये आणखी एक साम्यता होती ,ती म्हणजे त्या दोघांची ' टूथब्रश मिशी ' !!! चार्ली चे ट्राम्प नावाचे पात्र हुबेहूब हिटलरची नक्कल करून वंशवाद , युद्धखोरी ,हिंसक आणि शस्त्रोत्सुक राष्ट्रवाद यांच्यावर कडक टीका करत असे . चार्ली ने त्याची राजकीय वैचारिक भूमिका चित्रपट व्यवसायावर परिणाम होईल, या सबबी खाली कधीही लपवून ठेवली नाही . तो सातत्याने नाझिझम आणि फसिझम च्या विरोधात बोलत राहिला . 'दि ग्रेट डिक्टेटर' या चार्ली चाप्लीन च्या सिनेमाने हिटलरच्या राजकीय आणि फासीस्ट ,वंशवादी भूमिकेवर प्रचंड प्रहार केले . ट्राम्प नावाच्या पात्रा ऐवजी एका जेविश बार्बर चे पात्र या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते आणि ऑडेन्वाईड हेंकेल हे उपहासात्मक पात्र हिटलरची जाम खिल्ली उडविणारे होते. विशेष म्हणजे या दोन्ही भूमिका चार्ली चँप्लीन यानेच केल्या होत्या ! अमेरिकेची काहीही भूमिका असली तरी हॉलिहुड च्या भांडवलदारांना अशी थेट भूमिका व्यवसायावर विपरीत परिणाम करणारी वाटत होती . पण चार्ली ने भूमिका बदलली नाही. तो सातत्याने फँसिस्टांच्या विरोधात बोलत राहीला. त्याकाळी हिटलर सर्वात जास्त कोणाला घाबरून असेल तर तो चार्ली चाप्लीन ला असेही म्हटले जायचे . 'दि ग्रेट डिक्टेटर' या चित्रपटाच्या शेवटी जेविश बार्बर चे म्हणजेच चार्लीचे जागतिक लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेले भाषण म्हणजे एक आधुनिक मानवजातीसाठी मार्गदर्शक असा प्रेरणास्रोत म्हणावे लागेल . नव्या संशोधनातून आणि कांही कागदपत्राधारे असे समोर आले आहे कि ,चार्ली हिटलरच्या हिटलिस्ट मध्ये होता . त्यामुळे त्यांची भेट होणे शक्यच नव्हते.
हिटलर आणि जवाहरलाल यांची मात्र भेट झाली नाही ,पण घडू शकली असती ,अशीही शक्यता नव्हती. कारण नेहरूंनी जर्मनीला भेट ,ही हिटलरच्या उदयाच्या पूर्वी दिली होती . ज्या वर्षी हिटलर सत्तेवर आला ,त्यावर्षी नेहरू अहमदनगर च्या किल्ल्यातील तुरुंगात होते. त्यांची सुटका १९३६ कमला नेहरू यांच्या उपचारासाठी म्हणून करण्यात आली . पुढे त्याच वर्षी स्वित्झर्लंड मध्ये कमला नेहरू वारल्या आणि त्यांचे तिथेच दहन करून येताना ,नेहरू काही काळ रोम मध्ये होते . मुसोलिनीने कमाला नेहरू यांच्या मृत्यूबद्दल सहवेदना प्रकट करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली .मात्र अनेक वेळा निरोप पाठवूनही ,माझ्या वैचारिकतेला फासिझम मान्य नसल्यामुळे , आपले आभार परंतु मी आपणास भेटू इच्छित नाही अशी स्पष्ट भूमिका नेहरूंनी घेतली . मग हिटलर ची भेट तर त्यांनी कधीच घेतली नसती ,हे उघड आहे.सुभाष चंद्र बोस यांनी मात्र हिटलर ची भेट घेतली होती .
चार्ली चँप्लीन ने हिटलर ची भेट घेतली नाही आणि जवाहरलाल नेहरूंनी मुसोलिनीची भेट नाकारली ,पण जवाहरलाल नेहरू आणि चार्ली चँप्लीन यांची मात्र भेट आवर्जून झाली ,कारण चार्ली चँप्लीन आणि जवाहरलाल नेहरू यांची दुसऱ्या महायुद्धातील हिटलर आणि मुसोलिनी यांच्या बद्दलची भूमिका एकसारखीच होती . चार्ली चँप्लीन १९५२ साली स्वित्झर्लंड येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आले . नेहरू आणि इंदिराजी १९५३ साली स्वित्झर्लंड च्या दौर्यावर होते. चार्ली चँप्लीन ने आवर्जून नेहरूंच्या भेटीचा वेळ मागून घेतला. तेंव्हा नेहरू आणि चार्ली , इंदिराजी सहित बर्जेनस्टोक येथील डोंगरदऱ्यात गप्पा मारत मारत जावू लागले .नेहरू कार वेगाने चालवीत होते आणि गप्पाच्या ओघात चार्ली चँप्लीन ने नेहरूंना विचारले भारताची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे ? त्यावर हसून नेहरू म्हणाले " दिशा कोणतीही असो ,ती भारतीयांचे भवितव्य उज्ज्वल करणारी असावी ". नेहरूंनी चार्ली चँप्लीन यांना त्यांच्या 'दि किंग ऑफ न्यूयार्क' या चित्रपटाविषयी विचारले ,कारण हा चित्रपट अमेरिकेतील भांडवलवादी राजकीय धोरणावर व्यंगात्मक टिप्पणी करणारा होता. समविचारी समवयस्क आणि आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या दोन दिग्गजांची भेट खरोखरच अभूतपूर्व म्हणावी लागेल .
चार्ली चँप्लीन ने जीवनातील ,दुख, शोषण , दारिद्र्य यांचे वास्तववादी चित्रण केले . त्यांच्या १९१९ मधील 'दि कीड' या चित्रपटाने अनाथ बालकांच्या स्थितीवर टाकलेला प्रकाश आणि दर्शविलेली दाहकता मन विषन्न करणारी आहे. या चित्रपटानंतर चार्ली चँप्लीन ने खास लहान मुले हा प्रेक्षक वर्ग समोर ठेवून, लहान मुलांच्या मनावर मानवतावाद आणि जागतिक शांतता बिंबविण्याचे महान कार्य चित्रपटा सारख्या माध्यमातून केले . हिटलर ,मुसोलिनी यांच्या विचाराने भारावून जावून जग उध्वस्त करणाऱ्या पिढीच्या वारसांना ,चार्ली चँप्लीन च्या चित्रपटांनी विनोदाच्या माध्यमातून दिशा दिली . नेहरू आणि चार्ली चँप्लीन यांच्यात हा एक समान दुवा होता ,कि ते दोघही भविष्याकडे पाहत होते म्हणूनच त्यांच्यासमोर जगाचे भवितव्य म्हणून जगभरातील लहान मुले होती. दोघांचीही राजकीय आणि सामाजीक भुमिका अतिमत: समस्त मानवजातीचे कल्य़ाणासाठीच होती. चार्ली प्रमाणेच नेहरू देखील लहान मुलांमधे रमून जायचे.त्यांना मुले आवडाची! नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा होतो. आज चार्ली चँप्लीन यांचा १२५ वा जन्मदिवस !!!! मानवतावादी मनस्वी कलावंतास विनम्र अभिवादन !!!!!!!!!!!!!!!
@ राज कुलकर्णी .

Comments
Post a Comment