भारतीय समाजमनातील नेतृत्वाचे आणि हौतात्म्याचे मापदंड!!!!!

भारतीय समाजमन धार्मिक आहे ,धार्मिकतेच्या भारतीयांच्या आंतरिक प्रेरणा उपनिषदातील आत्मअध्ययन,आत्मशुद्धी ,ज्ञानार्जन ,दया ,क्षमा या बाबींपेक्षा समाजातील रूढी ,परंपरा यातील कर्मकांडे आणि व्यक्तीनिष्ठता, व्यक्तिपूजा ,विभूतीपूजा यात गुरफटून गेलेले आपणास दिसून येते. ईश्वराचे अस्तित्व जगातील सर्वच धर्मातील तत्वज्ञानाचा मुळ गाभा आहे, मात्र ईश्वराच्या सगुण रुपाची आराधना,पूजा ही भारतीय उपखंडातील समाजमनात खोलवर रुतून बसलेली आहे . ते एवढी कि मूर्तीपूजा निषिद्ध असणाऱ्या इस्लाम ला सुद्धा इथे पीर ,दर्गे ,मजारी बांधून धर्मप्रसार करावा लागला . ईश्वराबद्दल असणारी ही अपार श्रद्धा , त्याच्या सामर्थ्यातून , भीतीतून आणि त्याचबरोबर अलौकिकात्वातून आलेली आहे . याच भावनेतून म्हणून ऐतिहासिक व्यक्तिमत्वे देखील ईश्वराच्या रुपात पाह्यली जावू लागली. ज्या मानवांनी इतिहासात महान कार्य केले ते ईश्वरी शक्ती शिवाय शक्य नव्हते ,या भावनेतून त्यांना दैवत्व बहाल केले गेले . म्हणूनच राम, कृष्ण हे प्रत्यक्ष देवत्वास पोचले तर महावीर ,गौतम बुद्ध हे देवाचे अवतार मानले गेले.
भारतीय समाजमानाने हजारो वर्षापासून याच धार्मिक भावनेतून प्रभावशाली व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय समाजाने प्राचीन युगापासून मध्ययुगात आणि पुढे आधुनिक जगात प्रवेश केला . ऋषी ,मुनी, आचार्य ,भिखू ,गुरु यांच्या अलौकीकात्वाच्या, सश्रद्धतेच्या सुख-संसार त्यागाच्या , निरिच्छ वृत्तीच्या,विरक्तीच्या, ज्ञानसाधनेच्या गौरवपूर्ण भावनेतून आणि श्रद्धेतून भारतीय समाजाने नेतृत्वाचे मापदंड निश्चित केले आणि महानतेच्या ,नेतृत्वाच्या संकल्पना या सश्रद्ध असणे , सुख संसाराचा त्याग करणे ,विरक्ती वृत्ती असणे या सदगुणांच्या आधारे विकसित होत गेल्या. काळाच्या ओघात व्यक्तिनिष्ठता आणि व्यक्तिपूजा यामुळे नेतृत्वाच्या मापदंडातील ज्ञानसाधना देखील लोप पावली.
मध्ययुगीन कालखंडात ,नेतृत्वाचे हेच मापदंड सर्वमान्य झाले होते. लोकांना साधू ,संत , ऋषी ,मुनी यांच्या धार्मिक , अलौकिक , सश्रद्ध ,त्यागी आणि विरक्ती वृत्तीमुळे समाजात आदराचे स्थान निर्माण झाले. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ , गोरखनाथ हे निव्वळ धार्मिक नेते नव्हते तर तत्कालीन समाजच धार्मिक असल्यामुळे आपसूकच ते समाजाचे नेते बनले. परंतु मध्ययुगीन कालखंडातील राजकीय संघर्षामुळे धाडशी ,पराक्रमी ,शूरवीर अशा मानवांनी देखील समाजाचे नेतृत्व केले. प्राचीन भारतात पराक्रम शौर्य नव्हते असे नव्हे, पण त्यांचे शौर्य धर्मग्रंथात बंदिस्त झाल्यामुळे ,त्याला पोथीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ते शौर्य केवळ आदरास आणि वंद्यतेस पात्र ठरले गेले.
धार्मिक प्रेरणेतून वंद्य आणि आदर असणाऱ्या महान व्यक्तीचे नेतृत्व स्वीकारून देखील जनसामान्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काहीच बदल झाला नव्हता . म्हणून तत्कालीन काळातील आर्थिक ,सामाजिक स्थितीत भरडल्या गेलेल्यांनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक सत्तापालट आणि त्यासाठी होणारा सत्तासंघर्ष यातून करण्याचा प्रयत्न केला . साहजिकच या संघर्षात शौर्य,पराक्रम, धाडस, हे सदगुण उपयुक्त होते. शौर्यात शत्रूवर केलेली हिंसा आपसूकच कौतुकाचा विषय ठरते, त्यामुळे हिंसेला योग्य ,संयुक्तिक किंवा गीतेत कृष्णाने अर्जुनास सांगितलेली पवित्र हिंसा , अशा भूमिकेतून मान्यता मिळत जाते . या सर्व स्तिथीत प्राचीन काळापासून स्वीकारलेल्या महान व्यक्तीच्या आणि आदर्श नेतृत्वाच्या मापदंडात धार्मिकता, अलौकिकत्व , सश्रद्धता,त्याग, विरक्ती यासोबत शौर्य, हिंसा ,पराक्रम आणि धाडस यांना महत्व प्राप्त झाले. याच नव्या मापदंडाच्या प्रकाशात मध्ययुगातील महान व्यक्तीचे ,महान नेतृत्वाची महती ,थोरवी गौरविली जावू लागली . या मध्ययुगीन मापदंडाच्या गुलामगिरीतून भारतीय समाज आजच्या आधुनिक विज्ञानाच्या कालखंडात देखील सुटू शकलेला नाही ,हे भारतीय समाजातील जडणघडणी मधील वास्तव आहे.
एकोणिसावे शतक जगासाठी औद्योगिक क्रांती घेवून आले , सोयीसुविधा आल्या ,नवीन साधने आली ,उपकरणे आली आणि संपूर्ण जगाच्या समाज जीवनात घुसळण झाली ,सर्व कांही बदलले ! आधुनिक विज्ञानाच्या आधारे धर्मावर झालेल्या प्रहारांनी ,धर्माला देखील नवीन रूप प्राप्त करून दिले , राज्यकारभाराची पद्धती बदलली आणि संघर्षाचे स्वरूप देखील पालटले. पण नेतृत्वाची आणि महानतेची संकल्पना मात्र प्राचीन काळातील धार्मिकता, अलौकिकत्व , सश्रद्धता,त्याग, विरक्ती यासोबत मध्ययुगातील शौर्य, हिंसा ,पराक्रम आणि धाडस यातच गुरफटून राहिली!
खरेतर आधुनिक कालखंडातील नेतृत्वाचे आकलन करताना प्राचीन आणि मध्ययुगीन मापदंड अप्रस्तुतच ठरतात. त्यामुळे भारतीय समाजमन आधुनिक कालखंडातील नेत्यांच्या कर्तृत्वाचे अवलोकन करण्यास अजिबात तयार नसते ,ही वस्तुस्थिती आहे . कारण आधुनिक काळातील नेतृत्वाचे कर्तृत्व हे लोकशाही व्यवस्थेतील सनदशीर मार्गाचा अवलंब करून मानवी जीवन सुखी करण्यासाठी केलेल्या कामाच्या योगदानावर अवलंबून असते. मुत्सुदीगिरी, कायदेशीर निर्णय यामध्ये भारावलेपण अजिबात नसते ,यात शौर्य हिंसा ,पराक्रम आणि धाडस असे काही नसते शिवाय एखादे नेतृत्व जर वैयक्तिक जीवनात धार्मिक किंवा सश्रद्ध नसेल तर अशा व्यक्तिमत्वाला समाजात उपेक्षा सहन करावी लागते. नितीमत्ता ही धर्माचा भाग म्हणून समाज मान्यता असल्यामुळे ध्येयधोरणे ,विचार यापेक्षा वैयक्तिक चारीत्र्यास महत्व दिले जाते ,ज्या चारित्र्याच्या कल्पना पुन्हा प्राचीन आणि मध्ययुगीन असतात.
आजही आपल्या देशभक्तीच्या ,त्यागाच्या संकल्पना धार्मिकता, अलौकिकत्व , सश्रद्धता विरक्ती यासोबत शौर्य, हिंसा ,पराक्रम आणि धाडस यावर आधारलेल्या असतात. देशात सर्वात देशभक्त कोण म्हटले कि, चटकन ओठावर सैन्याचे नाव येते ! कारण वाचन,अध्ययन,आकलन न करता सहज सुचणारे हे उत्तर असते ! समाजातील अनेक घटकांना आधुनिक कालखंडातील नेतृत्वाच्या विचारांविषयी, धोरणाविषयी, कार्यपद्धती विषयी अजिबात माहिती करून घेणे योग्य वाटत नसते. एवढेच नव्हेतर आधुनिक कालखंडात सुद्धा मध्युगातील महान शासकांचे मूल्यमापन नेतृत्वाचे चुकीचे मापदंड वापरून केले जाते ! शिवाजी महाराज म्हटले शायिस्तेखानची बोटे कापणे, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे इ . प्रसंग आठवतात पण त्यांनी निर्माण केलेली महसुली पद्धती ,शेतकऱ्यांसाठीच्या सुधारणा, याचा उल्लेख जास्त केला जात नाही. कारण समाजात आजच्या एकविसाव्या शतकात देखील कोणीतरी गड कसा जिंकला ! , त्यांनी शत्रूचे मुंडके उडवले ! इंग्रजांना गोळ्या घातल्या ! बोटीतून समुद्रात उडी मारली, हत्त्येचा कट किती गुप्त पद्धतीने रचला ! किंवा तो हसत हसत फासावर गेला ,या घटनांच्या स्मरणाने भारावलेपण येते ,त्यातून त्यागी ,पराक्रमी,धाडशी व्यक्तिमत्वांना धार्मिक किंवा सश्रद्धतेचे हारतुरे घालून सजवले जाते!
देशातील सर्वच सशस्त्र क्रांतिकारक धार्मिक होते, सश्रद्ध होते असे दर्शविण्याचा प्रयत्न याच मानसिकतेतून केला जातो. धार्मिकतेच्या आणि सश्रद्धतेच्या संकल्पनेतून देवावर विश्वास असणारे , पूजा करणारे ,मंदिरात जाणारे ,उपास तापस करणारे नेते गौरविले जातात. त्याग ,विरक्ती चे स्तोम दर्शविताना सुखाचा -संसाराचा त्याग ,ही संकल्पना मनात घर करून बसते आणिब्रह्मचारी, अविवाहित किंवा लग्नानंतर गृहत्याग करणारे नेते आपसूकच मोठे वाटायला लागतात. अशा भरवलेल्या ,भावनिक वातवरणात कोणत्याही ठिकाणी समर्पणाची आणि त्यागाची अत्युच्च अभिव्यक्ती म्हणजे हौतात्म्य असते !
जगातील सर्वात मोठे प्रेमवीर कोण ? असा प्रश्न विचरला तर आपल्या समोर लैला-मजनू ,हिर-रांझा ,वासू-सपना येतात ,पण मुळात आपल्या समोर प्रेमवीर म्हणून तेच असतात ज्यांचे प्रेम असफल असते ! अर्थात त्यांचा त्याग मोठा आहेच मात्र संसारातील चढ-उतार ,गरिबी-श्रीमंती, लेकरांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारे ,प्रसंगी उपाशी राहून मुलांना घास घालणारे ,वृद्धपणी आईवडिलांची सेवा करत ,कारखान्यात, शेतात राबराब राबणारे हजारो लैला-मजनू उपेक्षेचे धनी होतात. जीवन नष्ट न करता जीवनरूपी हौतात्म्य पत्करून ,रोज हुतात्मा होणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे नेतृत्व गौरवीने गरजेचे आहे !
आधुनिक कालखंडातील आधुनिक नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचे समीक्षण ,अवलोकन जर नेतृत्वाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन मापदंडाच्या माध्यमातून न करता आधुनिक कालखंडातील घटना, संदर्भ , मुत्सुदिगिरी, राज्यकारभार ,ध्येयधोरणे ,सनदशीर मार्गाने ,कायदेशीर तरतुदींचा अभ्यासातून घेतलेले निर्णय याद्वारे केले तर ते अधिक योग्य होईल !
राज कुलकर्णी .

Comments
ReplyDelete
Post a Comment