संत परंपरा आणि धार्मिक सलोखा
भारतातील मध्य युगीन संत परंपरेत विविध धर्मीय संत मांदियाळीत वैचारिक आदानप्रदान होत असे आणि विविध धर्मीय संताना परस्परांबद्दल आदर वाटत असे . चांद बोधले आणि जनार्दन स्वामी गुरु बंधू . चांद बोधले यांचे शिष्य शेख महम्मद , यांनीच पुढे 'योगसंग्राम' नावाचा ग्रंथ लिहिला. श्रीगोंदा येथे महम्मद यांचा मठ आहे . शेख महम्मद यांनी जनार्दन स्वामी यांचा उल्लेख खूप आदरपूर्वक केला आहे . त्याच्या रचना धार्मिक प्रबोधन आणि धार्मिक सलोखा निर्माण करणाऱ्या आहेत . एका अभंगात तो म्हणतो
याति मुसलमान । मऱ्हाष्ट्री वचने।
ऐकती आवडीने । विप्रशुद्र।।
( संदर्भ - संत वाण्डमय ची सामाजिक फलश्रुती ले . गं. बा. सरदार )
सुफी शेख सली मोहम्मद यांनी अनेक कुट अभंगाची निर्मिती केली आहे.
सली मोहम्मद एका कुट अभंगात म्हणतो …
आम्ही जातीचे ब्राह्मण । आमचे सोयरे मुसलमान ।
स्नानसंध्या बोलविली । महारासि सोयरिक केली ।।
हुसैन अंबरखान या सुफी कवीने १६५३ साली गीतेवर भाष्य करणारा ८७१ ओव्यांचा ग्रंथ लिहिला . याच हुसैन अंबर खान याने जनार्दन स्वामी आणि चांद बोधले यांना दौलात्बाद किल्ल्यात आश्रय दिला होता . १६ व्या शतकात लतीफ शाह नावाचा महान सुफी संत झाल्याचा उल्लेख मोरोपंत यांनी त्यांच्या ' संमालीमाला ' या ग्रंथात केला आहे
( संदर्भ -मध्ययुगीन साहित्या विषयी - सतीश बडवे )
एवढेच नव्हेतर नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या शिष्य्मंडळात हिंदू आणि मुसलमान दोन्ही संत होते. पेशावर चा बाबा रतन हाजी हा गोरक्षनाथांचा प्रमुख मुस्लिम अनुयायी होता . त्याचे नाथ संप्रदायाचा प्रसार आताच्या अफनिस्तानापर्यंत नेला . काबुल येथे त्याने अनेकांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली . आजही त्यांना काबुल के जोगी बाबा रतन हाजी फकीर म्हणून ओळखले जाते . रतन हाजी आणि गोरक्षनाथाची भेट आपल्या दक्षिणेत गोदाकाठी झाली. मुहम्मद नावाच्या एका बादशाहाला हिंदू मुस्लिम ऐक्याची थोरवी सांगण्यासाठी त्याने " काफिर बोध " नामक ग्रंथ लिहिला . त्यात तो म्हणतो …
जिस पाणीसे कुल आलम उतपानां ।
ते हिंदू बोलिये कि मुसलमानां ।।
हिंदू मुसलमान खुदाई के बंदे ।
हम जोगी न रखें किस ही के छंदे ।।
" हिंदू आणि मुसलमान यांच्यात भेदभाव मानण्याचे कारण नाही . कारण ज्या बिंदू पासून हिंदू आणि मुसलमान निर्माण झाले ,तो बिंदू हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही . हिंदू -मुसलमान दोन्हीही एकाच परम तत्वाचे सेवक आहेत . म्हणून आम्ही जोगी असले भेद मानीत नाहीत"
( संदर्भ - नाथसंप्रदायाचा इतिहास ले. रा. चिं. ढेरे ,पद्मगंधा प्रकाशन पान क्र. २००)
नाथ संप्रदायातील हरी नाथांच्या एका परंपरेतील नाथ श्री ईश्वर नाथ हे सम्राट अकबराचे ( इ. स. १५४२ -१६०५) समकालीन होते आणि असे मानले जाते कि , अकबराने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते ! याच परंपरेतील एक शिष्योत्तम पूर्णप्रकाशानंदनाथ हा मराठी ग्रंथकार १७ व्या शतकाच्या अखेरीस होवून गेला. तो मुळचा कारवार जिल्ह्यातील अन्त्रवल्ली या गावचा . त्याने " श्रीपूर्णप्रबोधचंद्रोदय " नावाचा १८४७ ओव्यांचा मराठी ग्रंथ लिहिला आहे . या ग्रंथात त्याने अकबर आणि ईश्वर नाथ यांचे नाते सांगितले आहे . या ग्रंथात ग्रंथकाराने अकबराचे केलेले वर्णन खरोखर चिंतन करण्यासारखे आहे
आतां येथ वर्तमानी । धर्मराजा सिंहासनी ।
आरूढ भोगी राजधानी । शबरु राजा ।।
त्याचे नाम अकबर ।सर्व धर्माचे माहियेर ।
जगद्गुरु नाम बडिवार । प्रसिद्ध लोकी ।।
(संदर्भ - नाथ संप्रदायाचा इतिहास - रा .चि . ढेरे)
आश्चर्याची गोष्ट अशी कि , ख्रिस्ती संत कवी फादर स्टिफ़न्स यांनी १६१४ साली " ख्रिस्त पुराण " हा मराठी ग्रंथ लिहिला . संत एकनाथ यांच्या ते समकालीन होते, मराठी भाषा जाणून घेण्यासाठी तो खास पैठणला संत एकनाथांना भेटण्यासाठी आला होता. वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्ती आणि येशु विषयीचे प्रेम त्याला एकाच अनुभूती देतात असे तो म्हणतो . धार्मिक सलोखा सांगण्यासाठी आपल्या इतिहासात खूप काही आहे.
राज कुलकर्णी .

बाबा रतन नाथ जी यांच्या विषयी लीहीलेली माहीती पुर्णताः चुकीची आहे
ReplyDeleteआम्ही जातीचे ब्राह्मण हा अभंग पुर्ण द्या
ReplyDeleteशेख सलीमहंमद
Deleteआम्ही जातीचे ब्राह्मण।
आम्ही जातीचे ब्राह्मण। आमचे सोयरे मुसलमान ॥
स्नानसंध्या बोळविली। महारासी सोयरीक केली ॥
शेख सलीमहंमद भला । सून टाकूनी सासूसि गेला ॥
तिच्या पोटी कन्या जाली । ते फिरून बाईल केली ॥
[ संदर्भ:— प्राचीन गीत मंजूषा : : १४१ ]