अभिव्यक्ति स्वातंत्र्य आणि नास्तिकता
भारतीय राजयघटनेच्या अनुच्छेद १९ मधे प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे . प्रत्येक व्यक्तीस आपले मते मांडण्याचा ,त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा महत्वपूर्ण अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आणि तो जागतिक मानवी हक्काच्या सनदेतिल तरतुदींच्या सुसंगत असाच आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण असते ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ! नव्हेतर ते आदर्श लोकशाहीचे प्रमुख लक्षण समजले जाते . अभिव्यक्ती स्वातंत्र्यास बाधक असणारी एकाधिकारशाही ही राजकीय , लष्करी , आर्थिक आणि सर्वात जास्त परिणामकारक एकाधिकारशाही ही धार्मिक असते . म्हणूनच मुक्त विचार मांडणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य योद्ध्यांना सर्वात मोठा विरोध त्या त्या काळी प्रभावशाली असणाऱ्या धार्मिक नेत्यांकडून ,संस्थेकडून झालेला आहे . ही योद्ध्यांची परंपरा गौतम बुद्ध पासून , सॉक्रेटीस , ब्रुनो पासून ते थेट दाभोलकर ,पानसरे आणि अगदी अलीकडील अविजित रॉय पर्यंत येवून पोचते .
अभिव्यक्ती स्वातंत्र्यात प्रमुख तीन बाबींचा समावेश होतो....
the right to seek information and ideas;
the right to receive information and ideas;
the right to impart information and ideas
याच अनुषंगाने भारतीय राज्यघटनेत भारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे नमूद केले आहे . वैज्ञानिक दृष्टीकोन आणि चिकित्सक वृत्ती यांचा अंतर्भाव घटनेमध्ये करत असताना भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू म्हणाले होते " "What is needed, is the scientific approach, the adventurous and yet critical temper of science, the search for truth and new knowledge, the refusal to accept anything without testing and trial, the capacity to change previous conclusions in the face of new evidence, the reliance on observed fact and not on pre-conceived theory, the hard discipline of the mind, all this is necessary, not merely for the application of science but for life itself and the solution of its many problems." या मधील " the reliance on observed fact and not on pre-conceived theory ", ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आहे . याच भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अबिव्याक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ,चिकित्सक वृत्तीतून आजचा निरीश्वरवादी-अज्ञेयवादी विचार मेळावा आपण आयोजित केला आहे .
नास्तिकता हि संज्ञा आस्तीकतेचा अभाव ,अशा नकारत्मक स्वरुपात नसून ती अतार्किक ,दैवी ,अवास्तव ,अविवेकी बाबींना मानवी चिंतनातून दूर करून मानवी कर्तृत्व ,मानवी जीवन आणि एकूणच भौतिक स्वरूपातील मानवी मूल्यांना अधोरेखित करणारी विचारप्रणाली म्हणावी लागेल . त्यामुळे भारतीय समाजमनाच्या परिप्रेक्ष्यात मानवी मुल्याप्रती आणि सर्व मानवाला समान पातळीवर चिंतनाचा केंद्रबिंदू ठरवणारी आस्तिकता अशीच व्याख्या नास्तिकतेची करता येईल. नास्तिकता म्हणजे निव्वळ निरीश्वरवाद नव्हे, तर या विचारप्रणालीत निरीश्वरवादी , अज्ञेयवादी , शंकावादी, अनात्मवादी, विज्ञानवादी इत्यादी प्रवाहांचा संगम आहे आणि हा मेळावा या सर्व विचारांच्या अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे .
आदिम काळापासून दैवी संकल्पना ना विरोध करून निसर्ग व्यवहाराचे सत्य जाणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या छोट्या प्रवाहाचा मोठ्या स्वरुपात रुपांतरीत झालेला सागर असेच या आजच्या मेळाव्याचे वर्णन योग्य ठरणारे आहे .
मानव हा आदिमानवापासून चिकित्सक वृत्तीतून हळू हळू उत्क्रांत होत गेला, आजच्या स्थितीस येण्यास मानवाला निसर्गाबरोबर प्रचंड संघर्ष करावा लागला. निसर्गातील अनेक घटकांशी सतत संघर्ष करून विकसित झालेला मानव, संस्कृती करणाच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित होत होता .त्याचे ज्ञान अनुभव, निरीक्षण, त्याची कल्पनाशक्ती आणि चिकित्सक वृत्ती यातून विकसित झालेले होते . त्यात त्याच्या परिश्रमाची आणि जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचीही जोड होती. ' जग कोणी निर्माण केले ?' आणि 'जग चालते कसे ?' या प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले . त्याच्याभोवती असणारे तारे , सूर्य , चंद्र , पृथ्वी , आकाश, दिवस रात्र या बद्दलची जिज्ञासा त्याच्या विकसित होत असलेल्या मनात निर्माण झाली. मनात अनेक शंका , अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याची कारणे त्याला शोधणे अशक्य झाले तेंव्हा ,हे सर्व दैवी असल्याचा त्याचा निष्कर्ष त्याच्या मनातील सर्व प्रश्नांना तात्पुरत्या स्वरुपात का असेना पण शांत करणारा होता.'सोहम पासून कोहम' पर्यंत च्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने कल्पिलेल्या दैवी शक्तीवर सोपवली होती. ईश्वर या संकल्पनेच्या निर्मितीचीच ही कारणमीमांसा म्हणावी लागेल . काळ जसजसा पुढे जावू लागला , तसतसे मानवाच्या मनात घोंगावणारे प्रश्नांचे वादळ मोठे झाले आणि स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर त्याने जवळपास सर्व प्रश्नांची उकल केली . निसर्गातील प्रत्येक घटकाचे, घटनेचे भौतिक स्वरुपात उत्तरे शोधण्याच्या मानवी प्रयत्न म्हणजे, दुसरे तिसरे काही नसून , आज ज्या विचाराने प्रेरित होवून आपण जमलो आहोत, तोच हा विचार आहे . हा विचार प्रयत्नवादाचा आहे , प्रश्न्वादाचा , विज्ञान वादाचा आहे आणि अंतिमतः तो निरीश्वर वादाचा आणि मानवी कर्तृत्व अधोरेखित करणारा आहे .
आज जगात सर्वत्र धर्म ,धार्मिक तत्वज्ञान आणि त्यातून निर्माण होणारा उन्माद , हिंसा याचा प्रचंड प्रभाव समस्त मानवजातीवर दिसून येत आहे. कुठे सृष्टीनिर्माता आणि मानव त्याच्या शरीरातून निर्मिलेला प्राणी! , कुठे आकाशातला बाप आणि त्याचा पुत्र मानव !, कुठे आकाशातला तो स्वामी आणि त्याचा सेवक असणारा मानव ! , आजही या अतार्किक बाबी मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत . एकविसाव्या शतकात देखील विविध धर्म, धर्म ग्रंथ , पंथ , उपासना पद्धती यांच्या आधारावर प्रागैतिहासिक काळास शोभेल असा संघर्ष मानवी समूह करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि चिकित्सक वृत्ती ची गळचेपी ही आजच्या समाजात वाढीस लागलेल्या असहिष्णुतेची प्रतिक आहेत . विज्ञान आणि तंत्रज्ञानाने हातात आधुनिक शस्त्रे आली पण कांही मेंदू मात्र अश्मयुगातील असल्याचे हे द्योतक आहे .
मानवी कल्याण हा जगातील सर्व तत्वज्ञानाचा गाभा आहे. बदलेल्या परिस्थितीत अज्ञेय वाद , विज्ञानवाद आणि निरीश्वरवाद या मानवतावादी विचारांच्या प्रकाशात मानवी समाजातील धार्मिक उन्माद , हिंसा, विद्वेष यासारख्या अंधकार निर्माण करणाऱ्या शत्रूशी आम्ही लढा देवून यशस्वी होवू ,असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
नास्तिकता किंवा निरीश्वरवाद याचा अर्थ भावनाहीनता किंवा असंवेदनशीलता नव्हे ! उलट काल्पनिक दैवी शक्तीप्रती संवेदनशील असण्यापेक्षा, प्रत्यक्ष तुम्च्यामाझ्यासारख्या हाडामासाच्या मानवाशी सर्व अर्थाने भेदभाव विरहीत संवेदनशील असणे ,ही बाब त्यात अनुष्युत आहे. त्यामुळे ही अवस्था संवेदनशील तेचे गौरीशिखर म्हणावे लागेल ! मानवी मन भावनाशील आहे आणि त्यातच त्याचे माणूसपण आहे. मानवी मेंदूचा रंग करडा आहे पण त्यात उमटणारे विविध भावनांचे तरंग विविध रंगी आहेत . संवेदनशीलता आणि भावनाप्रधानता देखील आपणास विचारांच्या आधारावर स्विकारणे गरजेचे असते आणि ती तशी स्विकारताना तिचे अंतिम ध्येय मानवी कल्याण हेच असते. निरीश्वरवाद देखील आपण भावनेच्या भरात नव्हे तर , संवेदशील मनाने विचारपूर्वक केलेली ती कृती आहे.
मानवी मनाला भावनोत्कट करणारे मानवी जीवनातील सत्य म्हणजे मृत्यू ,परंतु मृत्यू समोर असताना देखील विचाराने निरीश्वरवाद स्विकारणारे भगत सिंग त्यामुळेच आपले प्रेरणा स्थान आहेत. उद्या २३ मार्च हा त्यांचा स्मृतिदिन !त्यांच्या या विचारांचा गौरव करण्यासाठीच या मेळाव्याचे प्रयोजन असल्याचे सांगत असताना माझा उर भरून येतो आहे . फासावर जाण्यापूर्वी भगत सिंग यांनी लिहिलेले 'मी नास्तिक का आहे ' हे पुस्तक त्यांच्या नास्तिकतेच्या पाठीमागील वैचारिक आणि सामाजिक भूमिका स्पष्ट करणारे आहे . भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू १९ डिसेंबर १९२७ रोजी म्हणाले होते " परलोकाबाबत आपण जितके कमी बोलू आणि त्याची जितकी कमी चिंता करू ,तितके आपण आपल्या देशाचे आणि देशबांधवांचे अधिक कल्याण करू शकू " भगत सिंग यांनी मांडलेला निरीश्वरवाद आणि जवाहरलाल नेहरू यांनी व्यक्त केलेला अज्ञेयवाद हा अंतिमतः मानवी कल्याणासाठी असून केवळ भारतासाठी नव्हेतर समस्त जगातील मानवतावादी चळवळी साठी हे विचार मार्गदर्शक आहेत. हा मेळावा या महान दार्शनिक नेत्यांच्या महान विचारांचे प्रतिबिंब असून , वैज्ञानिक मूल्यावर आधारित ,भेदभाव विरहीत , सुसंस्कृत मानवी समाजाच्या निर्मितीसाठी हा मेळावा म्हणजे " केप ऑफ गुड होप " अर्थात " सदिच्छा निर्माण करणारे बेट" आहे. या मेळाव्यासाठी असेच वर्णन सार्थ ठरेल! कवी सुरेश भट यांनी एका रचनेमध्ये म्हटले आहे ……
जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही,
फुकाचे काय शब्दाना मिळे दिव्यत्व सत्त्याचे ?,
घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही .
दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही .
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा,
वीजा घेवुन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही
.@राज कुलकर्णी

Comments
Post a Comment