विपर्यस्त......अर्धवट आणि अज्ञानी
दिक्षित साहेबांनी माझ्या लेखावर लिहीलेल्या टिकात्मक लेखात , माझ्या लेखातील माहीती विपर्यस्त पद्धतीने मांडून, मी असत्य माहिती दिल्याचा आरोप केला आहे जो, पुर्णत: चुकीचा आहे.
अभिराम दीक्षित यांनी माझ्या लेखावर केलेल्या टीकात्मक परीक्षणास खालील प्रमाणे उत्तर देण्यात येत आहे ....
1) आंबेडकर हे हिंदुत्ववादी नव्हते, तसे त्यांना प्रोजेक्ट केले जात आहे ,ही बाब मान्य केल्याबद्दल आभार
2) आंबेडकरांच्या धर्मांतरावर संतापून सावरकर यांनी ३० ऑक्टोबर १९५६ ला ‘केसरी’मध्ये लेख लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले होते ,ही बाब देखील अभिराम यांनी मान्य केली असून त्याबद्दल आभार.
3) माझ्या लेखातील एक त्रुटी मी देखील मान्य करतो की, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाच्या वेळी ,सावरकर रत्नागिरी मध्ये स्थानबद्ध अवस्थेत होते ,तरीही त्यांनी पत्र लिहून या आंदोलनाला पाठींबा दिला होता ,ही बाब माझ्या लेखात असायला हवी होती. माझ्या लेखाच्या अंतिम ड्राफ्ट मध्ये ती बाब नमूद होती ,मात्र छापून येवू शकली नाही, याबाबतीत माझी भूमिका योग्य त्या ठिकाणी मांडलेली आहे,त्याबाबतचा खुलासा मी नंतर करेनच !
परंतु समजा वर्तमान पत्राने खुलासा नाही केला तर ,माझे सोशल मेडीया वर प्रसिध झालेले वरील नमूद क्र. ३ मधील वक्तव्य माझा खुलासा म्हणून मान्य करावा ही विनंती. सोशल मेडीया वरील माझ्या या खुलाशाने एखाद्याचे समाधान होत नसेल तर , माझा युक्तिवाद असा की, माझ्या लेखात असे कुठेही म्हटलेले नाही की, सावरकरांनी डॉ.आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाला विरोध केला होता.
4) माझ्या संपूर्ण लेखात सावरकर काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी किंवा महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी काय करत होते ,असा प्रश्न कोठेही विचारलेला नाही. सावरकरांना राजकीय कार्य करण्यास बंदी होती हे मान्यच आहे , म्हणून मंदिर प्रवेश हे राजकीय कार्य आहे कि सामाजिक असा प्रश्न सुद्धा या लेखात अजिबात उपस्थित केलेला नाही.
5) महाडच्या पाणी सत्याग्रहाचा माझ्या लेखातील उल्लेख पुढील प्रमाणे आहे .....
--- महाडच्या पाणी सत्याग्रहानंतर तळे विटाळले म्हणून सनातन्यांनी त्या तळ्याच्या पाण्यात गोमुत्र ओतून तळ्याचे शुद्धीकरण केले! बाबासाहेबांनी या शुद्धीकरणाला ‘नीचतम प्रयत्न’ म्हणून संबोधले. स्पृश्य हिंदूच्या लेखी अस्पृश्यांचे मानवी मूल्य काय होते हेच यातून स्पष्ट होते. दलितांना अशुद्ध समजण्याच्या या मनोवृत्तीतूनच दलितांच्या शुद्धीकरण मोहिमेची सुरुवात केली गेली होती.
या मध्ये सनातनी असा शब्द प्रयोग वापरला आहे ,ज्यात कोणत्याही संघटनेचे वा नेत्याचे नाव नाही. हिंदू महासभेने स्वतंत्र मंदिर निर्माण वा शुद्धीकरण या चळवळी कोणत्या हेतूने सुरु केल्या यावर बाबासाहेबांनी खूप स्पष्ट पणे लिहिले आहे. दिक्षीत म्हणतात त्याप्रमाणे इथे सावरकरांचा उल्लेखही केलेला नाही.
6) माझ्या लेखासाठी वापरण्यात आलेले पूर्ण संदर्भ बहिष्कृत भारत ,मूकनायक , समाज समता संघाचे पाक्षिक समता आणि बाबासाहेबांची भाषणे या मधील असून प्रत्येक ठिकाणी मी त्याचा दिनांक नमूद केला आहे. हवे तर पान क्रमांक देखील देईन.
श्री. अभिराम दिक्षीत हे माझे चांगले मित्र आहेत. ते सावरकरांचे उत्तम अभ्यासक आहेत, सावरकर हे हिंदुह्रदयसम्राट आहेतच शिवाय ते मराठी भाषेचे तज्ञ देखील आहेत. हे दिक्षीतांना माहित असेलच! त्यामुळे मराठी भाषा, त्या भाषेतील शब्दांचा अर्थ कसा लावायचा हे त्यांना माहित नसेल तर नव्या माहितीचा स्वीकार करावा आणि आपले भाषाविषक ज्ञान वाढवावे आणि तसे करायचे नसल्यास अर्धवट ज्ञानाच्या फुलवाती पेटवित बसण्यात कांहीही अर्थ नाही.
बरं अजून एक बाब ....यारे य़ारे ईकडे यारे बघा बघा मी कसं करून ठेवलंय म्हणून याचे त्याचे नाव लिहून ..इतरांना हाका मारण्याचा उथळपणा मी करणार नाही. दिक्षीतांचा आक्षेप होता, म्हणून त्यांना उत्तर दिले.
©राज कुलकर्णी.
सावरकरांना मोठे करण्याचा का प्रयत्न चालू आहे ? मला हेच समजत नाही जितके मोठे करायचा प्रयत्न करणार तितक्या खोट्या गोष्टी पसरणार आणि सावरकरांची आहे नाही तितकि इज्जत कमी होणार.
ReplyDeleteग्रेट 👍👍
ReplyDelete