लीप सेकंद आणि अधिक महिना ……।
लीप सेकंद आणि अधिक महिना ……।
शालिवाहन शक ही चांद्र कालगणना अंगिकारलेल्या महाराष्ट्रात सध्या अधिक मासाची धावपळ चालू आहे. पंचागात पुरुषोत्तम मास ,मल मास म्हणून वर्णन केलेला हा महिना सर्वसामान्य लोकांत मात्र धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. जावई लोकांची या महिन्यात चंगळ असते! कपडे,आहेर आणि ३३ अनारसे किंवा पुरणाचे धोंडे सन्मान पूर्वक दिले जातात . पुण्य पदरात पडून घेण्याच्या लालसेपोटी हे सर्व करण्याची धोंड सासऱ्यांना पडते, म्हणून तर त्या धोंड्याचा महिना म्हणत नसावेत ,अशी शंका मला वारंवार पडते ! याच धोंड्याच्या महिन्यात इंग्रजी तारीख ३० जून रोजी लीप सेकंद वाढवून आण्विक वेळेची जुळवणी वैश्विक वेळेबरोबर करण्यात आली . धोंड्याचा महिना देखील अशीच चांद्र कालगणनेची सौर कालगणनेशी केलेली जुळवणी असते. या जुळवणीचा अर्थ सर्वसामान्य लोकास माहित नसल्यामुळे आणि त्याला धार्मिक वलय प्राप्त करून दिल्यामुळे होणाऱ्या खर्चामुळे लोग त्रागाने त्यास 'दुष्काळात तेरावा महिना' असेही म्हणतात.
'लीप सेकंद आणि अधिक महिना' ही संकल्पना समजून घेण्यासाठी प्रथम चांद्र आणि सौर कॅलेंडर मधील कालगणना पद्धती समजून घेणे गरजेचे आहे. भारतीय कालगणनेच्या अनुषंगाने विचार केला तर दिवस आणि तिथी यांचा परस्परांशी असणारा संबंध या दोन संकल्पनेतून स्पष्ट होतो.
आपण वापरत असलेली शालिवाहन शक ही चांद्र कालगणना असून एका शक वर्षात ३५४ सौर दिवस असतात. तर एक सौर वर्ष हे ढोबळमानाने ३६५ दिवसांचे असते।त्यामुळे चांद्र आणि सौर कालगणना यांत साधारणपणे ११ दिवसांचा पडणारा फरक अधिक मासाने पूर्ण केला जातो.
पंचांग म्हणजे तिथी ,वार,नक्षत्र ,योग आणि करण हि पाच अंगे . या पैकी फक्त तिथी आणि नक्षत्र हे वैज्ञानिक आहे. वार हे व्यावहारिक आहेत आणि योग -करण हे अवैज्ञानिक आहेत. चंद्राचे परिवलन आणि परिभ्रमण यांना लागणारा कालवधी एकसमान असतो . तो साधारण पणे २८ ते २९ सौर दिवसांचा असतो. परिभ्रमण कक्षेचे एकसमान तीस भाग केले तर एक भाग म्हणजे एक तिथी . म्हणजेच चंद्राची पृथ्वीभोवती असणारी भ्रमणकक्षा एक वर्तुळ म्हणजेच ३६० अंश गृहीत धरले तर एक तिथी म्हणजे १२ अंश . याचा अर्थ असा कि , चंद्राला पृथ्वीभोवती भ्रमण करताना १२ अंश अंतर कापायला लागणारा वेळ म्हणजे एक तिथी ! परंतु प्रत्येक तिथी चे अंतर समान असले तरीही , तो कापायला लागणारा वेळ एकसमान नसतो कारण ही कक्षा वर्तुळाकार नसून लंबगोलाकार आहे. चंद्र जेंव्हा पृथ्वीपासून दूर असतो,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कमी प्रभावामुळे हे अंतर लवकर कापले जाते . याउलट चंद्र जेंव्हा पृथ्वी च्या जवळ असतो ,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जास्त प्रभावामुळे अंतर कापण्यास वेळ लागतो. व्यवहारातील सोय म्हणून साधारणपणे सूर्योदयाच्या वेळेसची तिथी ही दिवसभराची तिथी असते . समजा असे गृहीत धरू कि ,सूर्योदयाच्या वेळी अष्टमी म्हणून त्या दिवसाची अष्टमी ही तिथी मान्य केली. परंतु सूर्योदयानंतर थोड्या वेळाने नवमी हि तिथी सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी चंद्राने १२ अंश अंतर लवकर कापल्यामुळे नवमी ही तिथी सूर्योदय होण्यापूर्वी संपून ,सूर्योदयाच्या वेळी दशमी ही तिथी असल्यामुळे , त्या दिवशी दशमी ही तिथी मान्य केली. तर या वेळी नवमी तिथीचा क्षय झालेला असतो. तिथी वृद्धी देखील अशीच सांगता येते. मागील दोन वर्षी मात्र तिथी वृद्धीमुळे दोन दिवस विजयादशमी अर्थात दसरा हा सन साजरा झाला होता आणि दोन दिवस दशमी ही तिथी असल्याचे अनुभवायला मिळाले होते . चंद्र कालगणना वैज्ञानिक असली तरीही ती तिथी क्षय आणि तिथी वृद्धी च्या या कारणामुळे व्यवहारात अडचणीची आहे.
अगदी अचूक पद्धतीने कालगणना अभ्यासली तर, एक चांद्र वर्ष हे ३५४ दिवसांचे असते तर सौर वर्ष हे एक सौर वर्ष हे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंदाचे असते जगात कॅलेंडर एक तर सौर (solar ) आहेत किंवा चांद्र ( lunar ) आहेत ,मात्र भारतीय कॅलेंडर हे जगातील वैशिष्ट्य पूर्ण असे सौर -चांद्र ( Luni-solar ) कॅलेंडर आहे . हा ३५४ दिवस आणि ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंदाचा कालावधी भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिन्याची संकल्पना केलीली आहे . ज्यामुळे चांद्र कॅलेंडर हे सौर कॅलेंडर बरोबर जुळविले जाते. मुस्लिम वापरत असलेले हिजरी आणि फसली हे कॅलेंडर पूर्णतः लुनार कॅलेंडर असल्यामुळे त्यांचे सण वर्षभर फिरत राहतात . या उलट चंद्र कालगणना स्वीकारूनही दर तीन वर्षांनी हिंदू सण आपोआप जुळून येतात त्यामुळे तिथी अशास्त्रीय नाही आणि फक्त ती पंचांगात आहे म्हणून तिथी चुकीची ठरत नाही.
काळ हि विज्ञान विश्वात देखील मान्य केलेली सर्वमान्य समजुत आहे, कारण त्यात नियमितता आणली जाते ,जुळवणी केली जाते .सूर्य सोडून पृथ्वीला सर्वात जवळचा तारा " अल्फा सेंटोरी" हा पृथ्वीपासून ४.२८ प्रकाशवर्ष दूर आहे तर त्यानंतरचा तारा " प्रोक्झीमा सेंटोरी" हा ४.३२ प्रकाशवर्ष दूर आहे . एक प्रकश वर्ष म्हणजे एक वर्षात प्रकाश किरणांनी ,दर सेकंदाला ३००००० किमी वेगाने कापलेले अंतर . याचा अर्थ असा कि, " अल्फा सेंटोरी" पासून निघणारे प्रकाश किरण आपल्यापर्यंत पोचायला ४.२८ वर्ष लागतात . समजा आज " अल्फा सेंटोरी" वर मोठा स्फोट झाला तर ,त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचायला २०१८ मधील नोव्हेंबर महिना उजाडेल . त्या वेळेप्रमाणे ती घटना त्यांच्या आज दिवशी घडली असेल पण ती घटना आपल्या आज दिवशी घडली असणार. त्यामुळे आज सर्वमान्य असलेले ग्रेगरिअन कॅलेंडर देखील शास्त्रीय दृष्ट्या अचूक नव्हे ! ग्रेगरिअन कॅलेंडर मध्ये ,तर तीन वर्षांनी २९ फेब्रुवारी हा दिवस वाढवून वरील ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंद नियमित केले जातात आणि त्या वर्षाला लीप वर्ष म्हणून संबोधले जाते . ग्रेगरियन कॅलेंडर हे जुलिअन कॅलेंडर ची सुधारित आवृत्ती आहे . जुलिअन कॅलेंडर पूर्वी रोमन कॅलेंडर अस्त्वित्वात होते . पूर्वीच्या दहा महिने असणाऱ्या रोमन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून जुलिअस सीझर ने इ .स. पु . ४६ मध्ये १२ महिन्याचे जुलिअन कॅलेंडर आणले ,ते फक्त युरोप आणि मध्य आशिया रशिया या देशात वापरले जात होते,त्यात १५८२ ला सुधारणा करून दर ४ शतकाला ३ दिवस वाढवून ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले गेले. जेंव्हा रशियात १९१७ साली ऑक्टोबर क्रांती झाली त्यावेळी जगभर नोव्हेंबर महिना चालू होता ,कारण रशियन झारशाही त्यावेळी जुलिअन कॅलेंडर वापरत होती . आज जगभर वापरले जाणारे ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा , वैज्ञानिकांनी अशास्त्रीय ठरवले आहे. शास्त्रीय कालगणना ही कितीही अचूक असली तरी ती व्यवहारात अशक्य आहे.
पृथ्वीचे परिवलन , सूर्याभोवती असणारे परिभ्रमण आणि इतर तार्यान्भोवती असणारे भ्रमण यांचा एकत्रित अभ्यास केला तर, पृथ्वीला स्वतःभोवती सूर्याच्या अनुषंगाने फिरण्यास २४ तास लागतात तर विश्वातील इतर ताऱ्यांच्या अनुषंगाने २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद एवढा कालावधी लागतो. पृथ्वीवर चंद्राच्या गुरुत्वाकार्षानामुळे पृथ्वी मंद होत असल्यामुळे हे घडते आहे . त्यामुळे शतकापूर्वी असणाऱ्या दिवसापेक्षा आधुनिक दिवस १.७ मिलीसेकंद मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात अचूक आण्विक वेळेचे ज्ञान व्हावे म्हणून २०० आण्विक घड्याळे असून त्यातील वेळ ही अगदी अचूक मानली जाते. तर वैश्विक वेळ पृथ्वीच्या परीवलानाशी संबंधित असून ती अचूक नसते कारण पृथ्वी वरचेवर मंद गतीने परिवलन करते आहे. आण्विक वेळ या वैश्विक वेळेशी जुळवली असता जो फरक आढळून येतो,तो लीप सेकंद वाढवून नियमित केला जातो. या प्रकारे कालगणना केली असता १९७२ साली आढळून आले कि ,आण्विक वेळेपेक्षा वैश्विक वेळ मागे आहे , म्हणून त्यावर्षी पहिल्यांदा ८६४०० सेकंदाचा एक दिवस न मोजता ८६४०१ सेकंदाचा एक दिवस मान्य करून लीप सेकंद वाढविण्यात आला. मागील महिन्यात ३० जून ला असाच एक सेकंद वाढवून ,दिवस एक सेकंदाने मोठा मोजण्यात आला. असले तरीही अजूनही या दोन्ही वेळेत ३६ सेकंदाचा फरक आहे .
मानवाच्या संस्कृती करणाच्या प्रक्रियेत जगातील सर्व मानव जातींनी निसर्गातील विविध घटकांच्या निरीक्षणातून आपापली कालगणना पद्धती विकसित केलेली आहे. वैज्ञानिकांसाठी कालमापन हा संशोधनाचा विषय असला तरी दैनदिन कामकाजासाठी त्याची व्यावहारिक उपयुक्तता मानवासाठी महत्वाची आहे. विज्ञान आणि व्यावहारिक उपयुक्तता यांची सांगड म्हणजेच अधिक मास ,लीप सेकंद किंवा लीप वर्ष या संकल्पना निर्माण केल्या आहेत .
© राज कुलकर्णी.

Comments
Post a Comment