तिथी ,पंचांग आणि ग्रेगरिअन कॅलेंडर
सध्या तिथी कि इंग्रजी तारीख यावर अनेकाकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत . आनंद हा केंव्हा साजरा करावा हे ज्याचे त्याने ठरवावे . पण या निम्मिताने भारतीय कालगणना आणि कॅलेंडर याचा तौलनिक अभ्यास केला तर लक्षात येईल कि प्राचीन भारतीय कालगणना हि खरोखरच शास्त्रीय होती . प्राचीन भारतीयांचे खगोल भौतिक हे शुद्ध विज्ञान होते ,म्हणून तर आर्य भट्ट ,भास्कराचार्य ,वराह मिहिर यासारखे गणिततज्ञ देशात होवून गेले .परन्तु जगात सर्वत्र अनुभव असा आहे कि या खगोल शास्त्रज्ञांना उपजीविकेचे साधन नसल्यामुळे फलज्योतिष्यावर अवलंबून राहावे लागत होते . त्यामुळे फल ज्योतीष्यामधील भ्रामक संकल्पना खऱ्या वाटाव्या म्हणून वास्तवाची हि जोड त्याला हवी होती . शेवटी ग्रहण कोणत्या दिवशी आहे ,हे अचूक सांगितले तरच ग्रहणाचे शुभाशुभ फळ सांगता येईल . त्यामुळे गणित महत्वाचे होते. फळ ज्योतिष्य हे विज्ञान नाही ,मात्र त्यातील गणित स्कंध ,सिंध्दांत स्कंध आणि होरा स्कंध यापैकी गणित स्कंध मात्र शुद्ध विज्ञान आहे. पंचांग म्हणजे तिथी ,वार,नक्षत्र ,योग आणि करण हि पाच अंगे . या पैकी फक्त तिथी आणि नक्षत्र हे वैज्ञानिक आहे. वार हे व्यावहारिक आहेत आणि योग -करण हे अवैज्ञानिक आहेत . फलज्योतिष चांद्र कालगणना ( Lunar calendar ) असून ते पृथ्वीकेंद्री सिंद्धान्तावर आधारलेले असले तरीही त्यातील गणित स्कांधामुळे ते अचूक आहे . चंद्राला प्रथ्वीभोवती १२ अंश अंतर कापण्यास लागलेल्या कालावधीस तिथी म्हणतात . या प्रकारे एक चांद्र महिन्यात ३० तिथी असतात. चंद्राच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा कालावधी सारखाच असल्यामुळे त्याची एकच बाजू आपल्याला दिसते ,मात्र प्रथ्वीभोती फिरत असताना ,पृथ्वीच्या जवळ चंद्र आला कि १२ अंश अंतर कापण्यास गुरुत्वाकार्षानामुळे वेळ लागतो ,तेच अंतर पृथ्वीपासून दूर असताना लवकर कापले जाते . यामुळे तिथी वृद्धी आणि तिथी क्षय होतो . मग तिथी वृद्धी होवून कधी कधी दोन्ही दिवस चतुर्थी किंवा तिथी क्षय होवून पंचमी नंतर लगेच सप्तमी येते . अमावाश्येपासून शुद्ध पक्ष आणि पौर्णिमेनंतर वद्य पक्ष अशी पाक्षिक कालगणना आहे. पण आपण व्यवहारात वापरतो तो सौर दिन म्हणजेच वार.पंचांगातील एक चांद्र वर्ष हे ३५४ दिवसांचे असते तर सौर वर्ष हे ३६५ दिवस ६ तास २४ मिनिटांचे असते . जगात कॅलेंडर एक तर सौर (solar ) आहेत किंवा चांद्र ( lunar ) आहेत ,मात्र भारतीय कॅलेंडर हे जगातील एकमेव असे सौर -चांद्र ( Luni-solar ) कॅलेंडर आहे . हा ३५४ आणि ३६५ मधील ११ दिवस ६ तास २४ मिनिटांचा कालावधी भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिन्याची संकल्पना केलीली आहे . ज्यामुळे चांद्र कॅलेंडर हे सौर कॅलेंडर बरोबर जुळविले जाते . हीच गोष्ट ग्रेगरिअन कॅलेंडर मध्ये ,तर तीन वर्षांनी २९ फेब्रुवारी हा दिवस वाढवून वरील ६ तास २४ मिनिट नियमित केले जातात. हिजरी आणि फसली हे कॅलेंडर पूर्णतः लुनार कॅलेंडर असल्यामुळे त्यांचे सण वर्षभर फिरत राहतात . या उलट दर तीन वर्षांनी हिंदू सण आपोआप जुळून येतात . त्यामुळे तिथी अशास्त्रीय नाही फक्त ती पंचांगात आहे म्हणून तिथी चुकीची होणार नाही . फळ ज्योतिष हे शास्त्र नसून ते थोतांड आहे हे निश्चित पण त्यामुळे भारतीय कालगणना चुकीची आहे असे नह्वे . ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा पूर्ण योग्य नह्वे , पूर्वीच्या दहा महिने असणाऱ्या रोमन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून जुलिअस सीझर ने इ .स. पु . ४६ मध्ये १२ महिन्याचे जुलिअन कॅलेंडर आणले ,ते फक्त युरोप आणि मध्य आशिया रशिया या देशात वापरले जात होते,त्यात १५८२ ला सुधारणा करून दर ४ शतकाला ३ दिवस वाढवून ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले गेले . आज जगभर वापरले जाणारे ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा , वैज्ञानिकांनी अशास्त्रीय ठरवले आहे . रशियन लोक ज्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हणतात त्यावेळी संपूर्ण जगात नोवेंबर महिना चालू होता कारण रशिया मध्ये त्यावेळी जुलिअन कॅलेंडर वापरत असत .भारतात मात्र आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५५ साली ज्येष्ठ वैज्ञानिक मेघनाथ सहा यांच्या सल्ल्यानुसार २२ मार्च १९५७ पासून चैत्र १ ,शके १८७९ पासून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर अमलात आणले आणि त्यासाठी शक स्वीकारला शालिवाहन राज्यांचा . म्हणून इसवी सणातून ७८ वजा केले कि शालिवाहन शक मिळतो . हे भारतीय कॅलेंडर सौर कॅलेंडर आहे ,मात्र महिने आणि शक चांद्र कॅलेंडर मधील आहेत.
राज कुलकर्णी
Comments
Post a Comment