विजयादशमी आणि नवमीचा तिथिक्षय ……………
अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी ,त्यानंतर महानवमी आणि विजया दशमी म्हणजे दसरा. या वर्षी अश्विन शुद्ध अष्टमी शालिवाहन शके १९३६ या तिथी नंतर नवमी या तिथीचा क्षय होवून अश्विन शुद्ध दशमी ती तिथी म्हणजेच दसरा आला आहे . शालिवाहन शक ही चांद्र कालगणना असून एका शक वर्षात ३५४ ते ३५५ सौर दिवस असतात . सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे असते . त्यामुळे चांद्र आणि सौर कालगणना यांत १० ते ११ दिवसांचा पडणारा फरक अधिक मासाने पूर्ण केला जातो .
चंद्राचे परिवलन आणि परिभ्रमण यांना लागणारा कालवधी एकसमान असतो . तो साधारण पणे २८ ते २९ सौर दिवसांचा असतो. परिभ्रमण कक्षेचे एकसमान तीस भाग केले तर एक भाग म्हणजे एक तिथी . म्हणजेच चंद्राची पृथ्वीभोवती असणारी भ्रमणकक्षा एक वर्तुळ म्हणजेच ३६० अंश गृहीत धरले तर एक तिथी म्हणजे १२ अंश . याचा अर्थ असा कि , चंद्राला पृथ्वीभोवती भ्रमण करताना १२ अंश अंतर कापायला लागणार वेळ म्हणजे एक तिथी ! परंतु प्रत्येक तिथी चे अंतर समान असले तरीही , तो कापायला लागणारा वेळ एकसमान नसतो कारण ही कक्षा वर्तुळाकार नसून लंबगोलाकार आहे. चंद्र जेंव्हा पृथ्वीपासून दूर असतो ,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कमी प्रभावामुळे अंतर लवकर कापले जाते . याउलट चंद्र जेंव्हा पृथ्वी च्या जवळ असतो ,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जास्त प्रभावामुळे अंतर कापण्यास वेळ लागतो . साधारणपणे सूर्योदयाच्या वेळेसची तिथी ही दिवसभराची तिथी असते . समजा असे गृहीत धरू कि ,सूर्योदयाच्या वेळी अष्टमी म्हणून अष्टमी ही तिथी मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी चंद्राने १२ अंश अंतर लवकर कापल्यामुळे नवमी ही तिथी सूर्योदय होण्यापूर्वी संपून ,सूर्योदयाच्या वेळी दशमी ही तिथी असेल्यामुळे त्या दिवशी दशमी ही तिथी मान्य केली तर नवमी अ तिथीचा क्षय झालेला असतो . मागील वर्षी मात्र तिथी वृद्धीमुळे दोन दिवस दशमी ही तिथी असल्याचे अनुभवायला मिळाले होते . चंद्र कालगणना वैज्ञानिक असली तरीही ती तिथी क्षय आणि तिथी वृद्धी च्या या कारणामुळे व्यवहारात अडचणीची आहे .
राज कुलकर्णी .
Comments
Post a Comment