Nehru frequently asked Questions 3
प्रश्न - नेहरूंनी चीनव्याप्त भाग चीनला द्यावा असे, म्हटले हे खरे काय.
उत्तर - भारत चीन सबंधातील वादाचे मुळ असणारी मॅकमोहन रेषा ही तत्कालीन ब्रिटीश आणि तिबेटीयन अधिका-यांनी 1913 साली आखली असून त्यावेळी भारत ब्रिटीशांच्या अंकित होता. दुस-या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि चीन मधील साम्राज्यवादी राष्ट्रांने आखलेली ही रेषा भारताला सोईची असल्यामुळे ती आपण मान्य केली पण चीनमधील नेत्यांना ती मान्य नव्हती. त्यातून भारत चीन वाद उदभवला! युद्ध झाले. पराभवही झाला. पण "ज्या पर्वतावर गवताचं पाते देखील उगवत नाही त्या जमिनीसाठी युद्ध कशाला करायचं?" असं नेहरू संसदेत म्हणाले होते. अश्या आशयाचा आरोप केला जातो. पण वास्तवात नेहरू म्हणतात
" Now, it is a question of fact whether this village or that village or this little steip of territory is on their side or on our side. Normally, wherever these are relatively pretty disputes, well, it does seem rather absurd for two great countries... immediately rush to each other's throat to decide whether this two miles of territory are on this side or on that side, and especially two miles of territory, in the high mountains, where nobody lives.
But where national prestige and dignity is involved, it is not the two miles of territory, it's nation's dignity and self-respect that becomes involved. And therefore this happens."
Jawaharlal Nehru, in Loksabha, September 4th 1959
"आता हे गाव किंवा ते गाव किंवा जमिनीचा हा लहानसा तुकडा आपल्या बाजूचा की त्यांच्या बाजूचा इतकाच वादाचा मुद्दा आहे. शक्यतो जिथं असे किरकोळ विवाद असतात, तिथं लगेच एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी धावणे हे दोन महान देशांसाठी अतार्किक आहे. तेही अवघ्या दोन मैलांचा प्रदेश या बाजूला की त्या बाजूला हे ठरवण्यासाठी, तो ही असा प्रदेश की जो उंच पर्वतात आहे आणि जिथं कोणीही राहत नाही. (काहीही जगू शकत नाही)
पण जेव्हा राष्ट्राचा अभिमान आणि महानता यामध्ये विचारात घेतली जाते, तेव्हा प्रश्न फक्त दोन मैलांच्या प्रदेशाचा नसतो. तेव्हा राष्ट्राची महानता आणि स्वाभिमान यामध्ये गुंतलेला असतो आणि म्हणून अशी युद्धं होतात."
- जवाहरलाल नेहरू.
संदर्भ - ४ सप्टेंबर १९५९ रोजी लोकसभेत दिलेलं भाषण
Comments
Post a Comment