Nehru frequently asked Questions 7
प्रश्न: - नेहरूंनी हिंदुस्तान नावाला विरोध केला होता काय? असेल तर का?
उत्तर - देश स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तान च्या निर्मितीबरोबर आपल्या देशाला हिंदुस्तान असे नाव देण्यात यावे ,अशी मागणी करणारा एक हिंदुत्ववादी वर्ग आपल्या देशात होता आणि आजही याच विचारांची मंडळी हिंसक ,उग्र स्वरूपातील हिंदुत्वाचा पुरस्कार करून , त्या बद्दल तत्कालीन पंतप्रधान नेहरूंवर टीका करत आहेत . पण त्यांना आपल्या देशाचे नाव ठरवत असताना पंडित नेहरू यांनी कोण कोणत्या बाबींचा विचार केला होता याची जाणीवही नसते . हे अगदी स्पष्ट आहे कि , हिंदुस्तान या नावाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता, हिंदुस्तान हे नाव नकळत भारताला पाकिस्तान च्या समकक्ष पातळीवर घेवून जाते ,असे त्यांचे मत होते . पाकिस्तान ला त्यांच्या देशाची तुलना आपल्या देशाबरोबर करण्याची कोणतीही संधी मिळता कामा नये ,असे ते म्हणत . याच कारणामुळे नेहरूंनी आवर्जून "गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया" या नावाचा आग्रह धरून भारताचे अधिकृत नाव "गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया" असे ठेवून " इंडिया इज भारत" असे हि ठणकावून सांगितले . कुरु कुळातील हस्तिनापुर नरेश चक्रवर्ती राजा भारत च्या नावावरून या देशाला भारत हेच नाव योग्य आहे असे सांगून त्यांनी इंडिया चा म्हणजेच भारताचा उल्लेख " पाच हजार वर्षाचे सातत्य" असा केला . १५ जुलै १९४७ ला अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आणि "the policy of free India" या ब्रिटीश जर्नल मधील लेखात नेहरू स्पष्ट म्हणतात " लवकरच भारत स्वतंत्र होईल ,पण त्या बरोबर पाकिस्तान ही निर्माण होणार आहे " हाच मुद्दा नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर हि मांडला " दोन देश स्वतंत्र झाले नाहीत, भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान निर्माण झाला आहे . त्यामुळे स्वातंत्रदिन फक्त भारताचा ! पाकिस्तान साठी तो निर्मिती दिन आहे ,आणि गेल्या पाच हजार वर्षापासून असणाऱ्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक अस्तित्वाचा वारसा आम्ही आहोत ' इंडिया इज भारत आणि मूळ "गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया" आम्ही आहोत " याच कारणामुळे नेहरूंनी २० फेब्रुवारी १९४७ च्या " Indian Independence Act " ची अंमलबजवणी म्हणून जून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन यांनाच " governor general " कायम ठेवण्यात आले आणि ब्रिटीश गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया चा वारसा इंडिया म्हणजे भारत याच देशाकडून कायदेशीररीत्या नियमित केला जात आहे, हे स्पष्ट झाले . नेहरूंच्या या धोरणाचे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक फायदे झाले....
१) भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य राहिला ,गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया या नावामुळे नवीन सदस्यत्व घेण्याची गरज पडली नाही ,उलट पाकिस्तानला स्वतंत्र अर्ज द्यावा लागला .
२) ब्रिटीशांनी स्वातंत्र्यापूर्वी गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया म्हणून जगात स्थापन केलेल्या सर्व वकिलाती ,वकिलातीची जागा भारताला मिळाल्या . पाकिस्तान ला स्वतंत्र पणे जागा खरेदी करून वकिलाती निर्माण कराव्या लागल्या .
३) वाकिलातीमुळे त्या देशांनी गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया सोबत केलेले करार हे भारताला मिळाले ,विशेषतः अखाती देशासोबत केलेले तेल पुरवठ्याचे pro-British करार आपसूक pro-India झाले आणि भारताला मिळाले .
४) ब्रिटीश गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया ने इंडोनेशिया बरोबर मे १९४७ मध्ये गह्वू पुरवठ्याचा करार केला होता ,गव्हाची हि जहाजे भारतात पोचली तेंव्हा सप्टेंबर १९४७ उजाडला होता , पाकिस्तान चे म्हणणे होते ,त्यात त्यांचा हिस्सा आहे ,पण करार गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया चा होता आणि त्यावर भारतातर्फे लॉर्ड माउंटबॅटन यांची सही होती ,आपण गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया हि होतो आणि आपले गवर्नर देखील लॉर्ड माउंटबॅटन च होते त्यामुळे सर्वच जहाजे भारताला मिळाली .
५) गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया यांनी केलेले शस्त्र सामुग्री ,दारुगोळा ,लष्करी विमाने याबाबतचे करार सुद्धा भारताला मिळाले , आणि स्वातंत्र्यानंतर जुने १९४८ पर्यंत हा पुरवठा आपल्याला होत राहिला .
६) म्यानमार ,चीन यांच्या बरोबर असणारे आंतरराष्ट्रीय सीमेचे सर्वाधिकार भारताला मिळाले एवढेच नह्वेतर तिबेट चे पालकत्व याच कारणामुळे आपल्याला मिळाले होते .
7) हैदराबाद विलीनकरणाच्या वेऴी याचा फायदा झाला कारण आपण इंडीयन गवर्नमेंट असल्यामुळे,आपल्या संमतीशिवाय हैदराबादला त्यांचे परकीय निधी वापरता येत नव्हते.
या शिवाय इतर अनेक बाबी आहेत ,परंतु केवळ भावनेवर स्वार होवून हिंदुस्तान या नावाबद्दल ओढ ,आकर्षण आणि आता उन्माद असणाऱ्या लोकांना एवढ्या सुक्ष्म पद्धतीने एखाद्या विषयाकडे पाहण्याची वृत्तीच नाही . पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचे आकलन करण्याची कुवत नसणाऱ्या लोकांना त्यांच्यावर उथळ टीका करण्याशिवाय काहीही शक्य नाही ,कारण अशा लोकांचा क्षमता त्यांच्या विचाराप्रमाणेच संकुचित असतात. म्हणून पं. नेहरू सारखी विशाल दृष्टीकोन असणारी असामान्य व्यक्तिमत्वच केवळ आधुनिक जगाची निर्मिती करू शकतात आणि जगाला दिशा दाखवू शकतात .
© राज कुलकर्णी..
हिंदुस्तान नव्हे, हिंदुस्थान!
ReplyDelete