फँसीझम नाझीझम आणि फिल्म
फँसिझम-नाझीझम आणि फिल्म जगत . नाझी विचारांचा प्रभाव जर्मनीत वाढू लागल्यावर पक्ष प्रचाराचे प्रमुख माध्यम म्हणून चित्रपट आणि टिव्ही शो कडे लक्ष देण्यात आले.चित्रपटांमध्ये समाजात मोठा प्रभाव टाकण्याची क्षमता व समाजातील यांची लोकप्रियता ओळखून चित्रपट कलावंताच्या प्रसिद्धीच्या जोरावर नाझी नेत्यांनी जनतेत स्वत:ची स्विकृती वाढविण्यास सुरूवात केली. सन १९२७ ते १९४५ या काळातील जर्मन सिनेमे नाझींच्या प्रचाराचे प्रमुख साधन बनले. हिटलर सत्तेत आल्यावर चित्रपटाचे कथानक काय असावे, कोणत्या कलाकारांना चित्रपटात रोल दिला जावा, चित्रपटातून काय संदेश द्यावा याचे निर्देश नाझी पार्टीकडून दिले जायचे. कांही सुमार दर्जाचे कलाकार हिटलरच्या जवऴ जाऊन पैसा नि प्रसिद्धी मिळवू लागले तर नाझी पक्षास समर्थन न देणा-या कलावंतांचा विविध प्रकारे छळ सुरू झाला. जोसेफ गोबेल्स त्यासाठी खास प्रचार मंत्रालयाची स्थापना केली व जर्मन संस्कृती, देशभक्ती यासाठी जर्मन सिनेमा असे धोरण जाहीर केले. या सर्व प्रयत्नाचा मुळ हेतू समाजात ज्यू वंशियाबद्दल द्वेष सतत वाढवत त्या द्वेषावर जर्मनीचा राष्ट्रवाद विकसित करणे हा त्यांचा हेतू