शिव्या आणि शाप
शिव्या आणि शाप ...................
'सत्यम शिवम सुंदरम'- सर्वात सुंदर शिव आहे आणि सत्य हे शिवाहून देखील सुंदर आहे ! भारतीय संस्कृती मध्ये शिव हे नाम मांगल्याचे ,पावित्र्याचे प्रतिक असले तरीही , संघर्षाच्या वेळी प्रतिस्पर्धी व्यक्तीचा उपमर्द करण्यासाठी ,अपमान करण्यासाठी ,त्याला हीन लेखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला शिवी म्हणतात ,हे ही वास्तव आहे.
शैवपंथ आणि शाक्तपंथ या अवैदिक संप्रदायांचा उपमर्द ,अवमान करण्यासाठी प्रचलित झालेल्या शब्द्समुहाला शिवी असेच नाव असू शकते. ते त्याज्य आहे ,ते अनिष्ट आहे कारण ते शैव आहे. शिवी या शब्दाची उपपत्ती अशी देखील मांडता येवू शकते ! माझी पणजी मध्व संप्रदायी मुद्राधारी वैष्णव कपडा फाटला किंवा उसवला तर शिव म्हणायची नाही तर 'टाका' घे ,असे म्हणायची ! अशा वैष्णव कुटुंबात शिवरात्रीला पुरण घालायची पद्धत आहे . तर काही स्मार्त ब्राह्मण कुटुंबात सत्य नारायण या कोणताही प्राचीन संदर्भ नसलेला पूजेला सत्य अंबा नावाचा पर्याय असल्याचे आढळून आहे . आज एवढ्या वर्षानंतर हे शेष म्हणून अस्तित्वात आहे मग प्राचीन काळात त्याची दाहकता किती असेल याची कल्पना ही न केलेली बरी !
शैव-शाक्त उपासना पध्दतीतील अनेक शब्दांंचा वापर वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत उपहासाच्या अनुषंगाने केला गेला. शैव-शाक्त संस्कार ,पूजा ,उपासना बद्दलचा तिरस्कार, द्वेष ,,उपहास, घृणा, उपमर्द ,अपमान,क्रोध ज्या शब्दातून प्रकट होतो ती शिवी ! म्हणूनच शिवी ही तिरस्कार, द्वेष ,,उपहास, घृणा, उपमर्द ,अपमान,क्रोध शिव्या ह्या एकाच वेळी अप्रगत मानवी अवस्थेतील हिंसक विजुगिषु वृत्तीचे केवळ कृतीहीन अहिंसक प्रकटीकरण आहेच त्याच वेळी ते विद्रोहाचे म्हणजे संताप ,राग या मानवी भावनेचे सुद्धा प्रकटीकरण आहे . शिव्या ह्या आपल्या पुरुष वर्चस्व वादी महान संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत . कारण मानवी संस्कृती ज्याप्रमाणे विकसित होत गेली त्याप्रमाणे शिव्यांची निर्मिति आणि विकास होत गेला.
अप्रगत किंवा विकसनशील अवस्थेत असताना पराभूत टोळ्यातील स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून लुटले जायचे. नव्हेतर पराभूत योद्ध्याच्या नात्यातील आई ,पत्नी ,बहिण या स्त्रियांवर जास्त अत्त्याचार केले जायचे ,कारण ते करणे म्हणजे पराजितांच्या पराभूत पणाचे आणि जेत्यांच्या विजयाचे ठळक वैशिष्ट्य मानले जात असे . विकसित होत असलेल्या मानवी समूहाच्या टोळ्यातील प्रत्येक पुरुष्याचे कर्तव्य हेकी त्याने त्याच्या स्त्रियांचे ,अपत्यांचे ,पशुधनाचे संरक्षण करावे ,यात तो कमी पडणे म्हणजे त्याचा पराभव होणे. आज शिव्या देताना प्रतिस्पर्धी व्यक्तीच्या नात्यातील याच स्त्रियांचा उल्लेख अपमानकारक पद्धतीने केला जातो. अप्रगातावास्थेतील या विजुगिषु वृत्तीतून जन्मलेल्या शिव्यांचा वापर आधुनिक काळात याच मानसिकतेतून होत असला पाहिजे . कारण या शिव्यांचा इतिहास हा भाषा जेवढी जुनी आहे तेवढाच जुना आहे. वेद ,उपनिषद ,ब्राह्मणे, अरण्यके, स्मृती ,पुराने, छंद ,निरुक्त ,दर्शने इ .ग्रंथात देखील शिव्या आहेत ,शाप आहेत. म्हणून तर शिव्याशाप अशा एकत्रित उल्लेख समाजात रूढ आहे.
यादव आणि चालुक्य कालखंडात मंदिराला दिल्या जाणाऱ्या दान धर्माचा उल्लेख असणाऱ्या शिलालेखा बरोबरच गाद्धेगळ नावाचे शिव्या शिल्प असे. मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून दिलेल्या शिवीचा शिलालेख आणि त्या शिवीचे सचित्र कोरीव शिल्प त्यावर असे .त्यात त्या व्यक्तीला शिवी देताना , त्या व्यक्तीच्या मातेचा किंवा स्त्रीचा गाढव या प्राण्यासोबत च्या संभोगाचा उल्लेख केला जाई. पुरुष वर्चस्ववादी वृत्ती या शिवी शिल्पातून स्पष्ट होते . असे शिल्प महारष्ट्रात जवळपास प्रत्येक धार्मिक क्षेत्री आढळते. माझ्या पाहण्यात तुळजापूर येथील मारुती मंदिरा समोर अशी दोन शिल्पे आहेत.
शाप हे शिवीचे संस्कारित रूप आहे ,पण त्याचा गाभा पुन्हा तोच आहे. 'तू मनुष्य योनीत जन्म घेशील ' तुला पुढील जन्म भूलोकी होईल' किंवा तू स्त्री होशील' तू शुद्राच्या पोटी जन्म घेशील' असे शापांनी आपली पुराणे प्रचंड भरलेली दिसून येतात . स्त्री आणि शुद्र यांचा अपमान ,हीनत्व ,तिरस्कार या शापांमध्ये ठासून भरलेले आहे . पण हे शब्द शाप या नावाखाली शुचिर्भूत म्हणून ओळखले जातात . रूढ अर्थाने आपण ज्याला शिवी म्हणतो अशा अभिजन भाषेतील अश्लील वाटणारया अनेक शब्दांनी आपले संत साहित्य भरून गेले आहे. अगदी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेमध्ये चांडाळ , शिंदळी ,निचाड ,वांझोटी ,अंड , रांड, भांड ,विटाळ , लंड , गधडा , विष्ठा, वेसवा हे शब्द नेमके किती वेळा आले आहेत ,हे सांगणे देखील कठीण आहे. एवढे या शब्दांचे प्रमाण जास्त आहे. स्त्रियांची आणि पुरुषांची जनन इंद्रिये ,स्त्री पुरुष संबंध ,स्त्री पुरुष अवयव यांच्या उल्लेखाचे रूढ अर्थाने अत्यंत अश्लील वर्णन असणारे खूप शब्द असणारे प्राचीन आणि अगदी धार्मिक देखील ग्रंथ आहेत. स्मृती आणि श्रुती मधील शिव्यासंबंधी विस्तृत लेखन वि क़ा. राजवाडे यांनी त्यांच्या " भारतीय विवाह संस्थेचा इतिहास " या ग्रंथात केले आहे.
प्रत्येक भाषेमध्ये शिव्या आहेतच ,नव्हेतर सर्वसामान्य मानवी समूहात राहणारा माणूस भाषा शिकताना प्रथम शिव्या शिकतो.शिव्या हे समस्त मानवी समूहातील संवाद माध्यमातील वास्तव आहे. मानव सुसंकृत झाला तरीही त्याच्या रानटी पणाचे अनेक अवशेष आज शिल्लक असल्याचे दिसून येतात ,शिव्या या त्यापैकीच असाव्यात. याशिवाय क्रोधीत होवून प्रत्यक्ष हिंसा करून एखाद्याला पराभूत करण्याचे बळ अंगी नसले कि माणूस शिव्या देवून शाब्दिक हिंसेतून मनाच्या समाधानाची आणि प्रतिशोध घेतल्याची जाणीव मनात बाळगत असावा. अशा वेळी शिवी ही क्रोधाची अभिव्यक्ती ठरते . निसंधीग्ध पणे सांगता येत नाही मात्र असे वाटते की , दु:ख जर रडल्याने हलके होत असेल ,तर राग हा शिव्यातून हलका होत असावा किंवा शिव्या मानवाला लढण्यासाठी आवश्यक अश्या द्वेष ,त्वेष, तडफ या भावनिक बाबींची पूर्तता करत असाव्यात.
राज कुलकर्णी

Comments
Post a Comment