मेरी आवाज सुनो .............


स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते १९६० आणि १९७० पर्यंतच्या कालखंडात देशभरातील प्रत्येक गावातील ,शहरातील घरात बैठकीत देव देवतांचे फोटो असायचे आणि त्या देवतांच्या फोटोसोबत असायचे आणखी कांही फोटो असायचे! महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा , महात्मा गांधींचा ,डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचा आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा ! गुजरात मधील घरात सरदार पटेल, बंगाल मधील घरात सुभाषबाबू यांचे देखील फोटो असायचे, परंतु गांधी-नेहरू मात्र सर्वत्र असायचे .
मला चांगले आठवते गावातील अनेक घराच्या 'डाहळज' मध्ये म्हणजे चिरेबंदी वाड्याच्या बैठीकीत शिवाजी महाराजांचा , महात्मा गांधींचा आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो आवर्जून पाहायला मिळत असे. आजची पिढी कदाचित यावर विश्वासही नाही ठेवणार, पण आपल्या राष्ट्रीय नेत्यावर एवढे प्रेम करणारे लोक त्यावेळी होते आणि त्यावेळेसचे नेते देखील एवढे प्रेम मिळवण्यास पात्र होते ! घरात फोटो लावावा असे नेते राहीले नाहीत, आता चौकातल्या होर्डींगवरच त्यांची जागा!
त्यावेळी नेहरूंवर प्रचंड प्रेम करणारे केवळ भारतीय नव्हेतर जगातही अनेक लोक होते.संपुर्ण जनमानसात नेहरूंची निर्माण झालेली प्रतिमा ,ही अशीच उत्तुंग होती आणि म्हणूनच ती आदरास पात्र होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ,नेतृत्वाचा आणि कार्याचा समाजातील सर्व क्षेत्रावर प्रभाव होता. आधुनिक भारत घडविणारे नेहरू जेंव्हा १९६४ साली गेले ,तेंव्हा देशातील जनतेत अनाथ झाल्याची भावना निर्माण झाली. देशातील नव्हेतर जगातील अनेक नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतून नेहरूंचे देहावसान ही जागतिक पटलावरील मोठी घटना होती. त्यामुळे भारत देखील या घटनेस एक राष्ट्रीय आपत्ती या अर्थाने पहिले गेले . ही अवस्था ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेची होती ,त्याचप्रमाणे देशातील बुद्धीजीवी लोकांची,साहित्यिकांची ,संशोधकांची, कलाकारांची देखील होती. साहजिकच या घटनेचा प्रभाव कला ,साहित्य, क्षेत्रावर देखील झाला आणि तो उत्कटरित्या अनेक साहित्यकृतीतून अभिव्यक्त देखील झाला. नेहरू वारल्यानंतर तीन वर्षांनी एक चित्रपट आला ,त्याचे नाव नौनिहाल ....
राजू नावाचा एक अनाथ मुलगा ,आपल्याला कोणीही नातेवाईक नाहीत हे समजल्यावर ,मी जवाहरलाल नेहरूंचा नातलग म्हणून सर्वांना सांगतो आणि त्या भावनेत तो स्वतःचे अनाथ असणे विसरून जीवन जगतो ,अशी या चित्रपटाची कथा ! राज मार्ब्रोस यांच्या दिग्दर्शनाने आणि संजीव कुमार, बलराज सहानी यांच्या अप्रतिम अभिनयाने सावन कुमार टाक यांच्या कथेला न्याय मिळाला . नेहरूंच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आणि अनाथ असणाऱ्या राजूला मिळालेला आधार याचे अतिशय समर्पक चित्रण या चित्रपटात आहे.
या चित्रपटातील 'मेरी आवाज सुनो ' हे गीत प्रख्यात उर्दू शायर कैफी आझमी यांचे गीत गायिले आहे मोहम्मद रफी यांनी आणि त्याला संगीत दिले आहे मदन मोहन याचं. या चित्रपटात नेहरूंच्या अन्त्यायात्रेचे चित्रीकरण प्रथमच सर्वसामान्य जनतेस पाहायला मिळाले. या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर 'मेरी आवाज सुनो' हे गीत म्हणजे मोहम्मद रफी-कैफी आझमी -मदन मोहन यांनी जवाहरलाल नेहरूंना वाहिलेली अत्युच्च श्रद्धांजली म्हणावी लागेल. नेहरूंच्या मृत्यूपत्रात त्यांनी व्यक्त केलेली इच्छा, त्यातील देशभक्ती, उत्कट समर्पण भावना आणि भारतीय जनतेबद्दल असणारे अमर्याद प्रेम, कैफी आझमी यांनी ज्या आत्मीयतेने शब्दबद्ध केले आहे त्याला तोड नाही ! त्यात रफी साहेबांचा हृदयाला भिडणारा ,मृदू आवाज, त्या आवाजातून व्यक्त होणारा 'दर्द' आणि पडद्यावर दिसणारी दृश्ये पाहून कोणीही संवेदनशील व्यक्ती सदगदित झाल्याविना राहणार नाही !
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
मेरी आवाज सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
मैने एक फुल जो सीने पे सजा रखा था
उसके पर्दे में तुम्हें दिल से लगा रख्खा था
था जुदा सबसे मेरे इश्क का अंदाज सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
जिंदगी भर मुझे नफरत सी रही अश्कोंसे
मेरे ख्वाबोंको तुम अश्कोंमे डुबोते क्यों हो
जो मेरी तरह जिया करते है ,कब मरते है
थक गया हूँ ,मुझे सो लेने दो ,रट क्यों हो
सोतेभी जागते ही रहते है जांबाज़ सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
मेरी दुनिया में न पूरब है ना पश्चिम कोई
सारे इंसान सीमट आये खुली बाहोंमे
कल भटकता था मैं जिन राहोंमे तनहा तनहा
काफिले कितने मिले आज उन्हीं राहोंमें
और सब निकले ,मेरे हमदम हमराज सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
नौनिहाल आते है ,अर्थि को किनारे करलो
मैं जहाँ था ,इन्हे जाना है वहांसे आगे
आशियाँ इनका ,जमीन इनकी ,जमाना इनका
है कई इनके जहाँ मेरे जहाँ से आगे
इन्हे कलियाँ न कहो ,है ये चमन साज़ सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
क्यों सँवारी है ये चन्दन की चिता मेरे लिए
क्यों सँवारी है ये चन्दन की चिता मेरे लिए
मैं कोई जिस्म नहीं हूँ के जलाओगे मुझे
राख के साथ बिखर जाऊंगा मैं दुनिया मैं
तुम जहाँ पाओगे ठोकर वंही पाओगे मुझे
हर कदम पर है नए मोड़ का आगाज़ सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मैने एक फुल जो सीने पे सजा रखा था
उसके पर्दे में तुम्हें दिल से लगा रख्खा था
था जुदा सबसे मेरे इश्क का अंदाज सुनो
मेरी आवाज सुनो
प्यार का राग सुनो
मेरी आवाज सुनो
'मेरी आवाज सुनो ' हेच गीत पुढे मोहम्मद रफीचे आवडते गीत बनले आणि पुढे १६ वर्षांनी मोहम्मद रफी वारले तेंव्हा त्यांच्या चाहत्यांनी ,संगीत रसिकांनी याच गाण्याच्या माध्यमातून रफी साहेबांना श्रद्धांजली वाहिली, बहुदा जो संदेश नेहरूंनी भारतीय जनतेला दिला होता ,तोच संदेश रफी साहेबांच्या चाहत्यांना, त्यांच्या स्मृतीत असणाऱ्या रफी साहेबांकडून मिळाल्याची भावना त्यांच्या मनात असावी
राज कुलकर्णी , उस्मानाबाद .

Comments