काव्यदिंडी- चित्तो जेथा भयशून्यो... Where the mind is without fear


काव्यदिंडी मध्ये मी आज घेवून आलो आहे ,रवींद्रनाथ टागोरांची एक अप्रतिम कविता. जी कविता १९१० साली सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि १९१२ साली 'गीतांजली. या महाकाव्यात तिचा समावेश झाला, पुढे या कवितेचे टागोरांनी स्वतःच इंग्रजी भाषांतर केले ,त्यांच्या या गीतांजली महाकाव्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले.
या कवितेने अनेकांना प्रेरणा दिली आणि आजच्या परिस्थितीत या कवितेचे खूप महत्व आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला या कवितेने एक वेगळाच अर्थ प्राप्त करून दिला. कारण स्वातंत्र्य केवळ उद्दिष्ट नव्हते तर मानवी कल्याण ,मानवी सन्मान महत्वाचा होता ,भयमुक्त समाज निर्मिती ही स्वातंत्र्याची खरी व्याख्या होती. राविन्द्रनाथांचा शिष्योत्तम जवाहर म्हणजे त्यांच्या गीतांजली मधील ऋतुराज ! असे वर्णन रवीन्द्रनाथांनी केले आहे. गुरूदेवांचा हा प्रभाव जवाहरलाल नेहरूंवर प्रक्षाने जाणवतो ,म्हणूनच नेहरूंनी म्हटले ,समस्त जगातील मानव मुक्तीसाठी आपण चळवळ सुरु केली आहे ,भारतीय स्वातंत्र्य लढा ,हा त्याचा एक भाग आहे.
आधुनिक भारत घडविण्यासाठी नियतीशी संकेत भेट घेणाऱ्या नेहरूंनी भारत देश कसा निर्माण करायचा आहे ,याचा वेध गुरुदेवांच्या या कवितेतून घेतला होता . त्यांनी त्यांच्या जगाचे ओझरते दर्शन या पुस्तकात ,९ ऑगस्ट १९३३ रोजी लिहिलेल्या शेवटच्या पत्रात या कवितेचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात ' दरीच्या तळाशीच आरोग्य विघातक अशा धुक्यामध्ये , सर्द हवेत राहाचे ,शरीराला उगीच कसल्या कष्टात किंवा धोक्यात घालायचे नाही, हा एक मार्ग आहे, अथवा धोके ,संकटे यांना संगतीला घेवूनच मोठे मोठे उंच पर्वत चढून वर जायचे आणि वरच्या पठारावरील मोकळी स्वछ हवा अनुभवायची ,दूरपर्यंत दिसणाऱ्या सुंदर दृशांचा आनंद उपभोगायचा आणि उगवणाऱ्या सूर्याच्या तेजाचे दर्शन घ्यायचे ,हा एक मार्ग आहे .त्यपैकि आपण कोणता पत्करायचा हा आपल्या प्रत्येकासामोरील प्रश्न आहे " आणि नेहरूंनी याठिकाणी रवींद्रनाथ यांची हीच कविता लिहिली आहे ............चित्तो जेथा भयशून्यो
अर्थात....Where the mind is without fear ……।
Where the mind is without fear and the head is held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth;
Where tireless striving stretches its arms towards perfection;
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action;
Into that heaven of freedom, My Father, let my country awake.
-Ravindrnath Tagore in Gitanjali
हे एक उत्तुंग प्रार्थना गीत आहे ,जे स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रकट करते. जिथे मुक्तपणे ज्ञान मिळेल ,भय नसेल ,जेथे सन्मानाने माथा उन्नत होईल ,विस्तीर्ण विचार आणि कार्य असेल ,जिथे स्वातंत्र्याचा स्वर्ग असेल ,अशा स्वातंत्र्याच्या स्वर्ग माझा देश असावा ,अशी प्रार्थना या कवितेत व्यक्त केली आहे .......
Into ever-widening thought and action;
Into that heaven of freedom, My Father, let my country awake.
नेहरूंनी ही प्रार्थना मनोमन अंगिकारली होती , त्यांच्या ' Tryst with Destiny ' या १४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या स्वातंत्र्य भारतातील पहिल्या भाषणात ते म्हणतात " We rejoice in that freedom, even though clouds surround us, and many of our people are sorrow-stricken and difficult problems encompass us. But freedom brings responsibilities and burdens and we have to face them in the spirit of a free and disciplined people.
On this day our first thoughts go to the architect of this freedom, the father of our nation, who, embodying the old spirit of India, held aloft the torch of freedom and lighted up the darkness that surrounded us.
नेहरूंच्या हयातीत नेहरूंवर 'Nehru : The Lotus eater from Kashmir ' नावाचे D.F.Karaka यांचे नेहरूंवर टीका करणारे पुस्तक प्रकाशित झाले ,अनेकांनी नेहरूंना याबद्दल सांगितले. नेहरूंनी ते पुस्तक स्वतः वाचले आणि लेखकाला वाचल्याचे कळवले . पण त्या पुस्तकावर बंदी नाही आणली . शंकर नावाचे एक व्यंगचित्रकार ,ज्यांनी नेहरूंवर अनेक व्यंगचित्रे काढली . शंकर यांच्या शंकर्स विकली या नियतकालिकाच्या प्रकाशनाच्या वेळी नेहरू म्हणाले ,मी चुकलो तर मला सोडू नका ,अवश्य टीका करा ( Dont spare me shankar ). नेहरूंना आधुनिक भारताची जडण घडण गुरुदेवांच्या विचारांच्या प्रकाशात अपेक्षित होती आणि साहित्य हेच अशा उत्तुंग विचारांचा स्रोत असते ,म्हणूनच १९५२ साली जेंव्हा नेहरूंनी साहित्य अकादमीची स्थापना केली, तेंव्हा साहित्य अकादमीच्या इमारतीला त्यांनी नाव दिले ' रवींद्र भवन '
स्वातंत्र्य म्हणजे भयमुक्त समाज …… ही शिकवण देणारी गुरूदेवांची ही कविता आजच्या काळात केवळ भारतासाठी नव्हे तर जगातील सर्व देशांनी ,सर्व देशातील नेत्यांनी आणि सर्व मानवी समूहाने अभ्यासावी आणि अंगीकारावी अशी आहे .
राज कुलकर्णी .

Comments