काव्यादिंडी सह पुन्हा एकदा............. 'The Road Not Taken


काव्यादिंडी मध्ये मी पुन्हा माझ्या अत्यंत आवडत्या कावितेसह रसिकांसमोर आलो आहे . आयुष्याच्या वाटेवर अनेक कठीण प्रसंग येतात खरे ,पण या कठीण प्रसंगातून जो यशस्वी पणे मार्गक्रमण करतो ,त्याचेच आयुष्य खऱ्या अर्थाने सफल होते . जीवनाच्या वाटेवर अनेकदा मनात द्वंद्व निर्माण होते ,आपण कोणती विचारधारा अंगीकारावी आपण सत्याला सामोरे जावे की ज्या सत्याला आपण सत्य समजत आहोत ते खरेच सत्य आहे की सत्य यापेक्षा कांही विलक्षण आणि नाविन्यपूर्ण काही आहे ? आपण स्वीकारलेल्या मार्गाने गेल्यावर सर्वांच कल्याण होईल ना ? कोणी दुखावणार तर नाही ना ? असे प्रश्न मनात घोंगावत असतात . पण आपल्याला निवडायचा आहे तो मार्ग सर्वसमावेशक ,सर्वांचे हित पाहणारा, केवळ अपघाताने मिळालेल्या जात ,धर्म, पंथ ,देश ,जन्मस्थळ,वर्ण या बाबींवर भेदभाव करणारा नसावा, तर तो सर्वांना उराशी कवटाळणारा असावा ,
" दुरितांचे तिमिर जावो ,विश्व स्वधर्म सूर्य पाहो ' या सर्वांना सुखी करणाऱ्या ज्ञानेश्वराच्या पसायदानाने दर्शविलेला असावा , गांधीजी प्रमाणे शेवटातील शेवटच्या माणसाचा अश्रू पुसणारा असावा, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले ,शाहू महाराज, गोपाल आगरकर , महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे, अनिष्ट रुढीना नष्ट करणारा , समतेचा संदेश देणारा , भेदभाव नष्ट करणारा , पददलित शोषित वंचित जनतेला ज्ञानाचा अधिकार देवून ,त्यांच्या जीवनाला सन्मान पूर्वक अर्थ प्राप्त करून देणारा तो मार्ग असावा. ' स्वातंत्र्य चळवळीला समस्त विश्वातील मानवाच्या मुक्तीची चळवळ मानणाऱ्या जवाहरलाल नेहरूंचा देखील मार्ग असावा, असे विचार मनात असतात .
पण हा मानवी कल्याणाचा मार्ग खडतर असतो ,या मार्गावर काटे असतात ,सतत संघर्ष असतो ,प्रसंगी दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्याप्रमाणे प्राणार्पण देखील करावे लागते ,म्हणून या मार्गावरून माघारी फिरावे असाही विचार मनात केंव्हा केंव्हा येतो ?
विचाराने मनात कोलाहल माजविलेला असताना ,विचारांच्या घनदाट जंगलातून प्रवास करताना दोन रस्ते समोर येतात ! एक असतो साधा सोपा ,जो सर्वानीच तुडवलेला रस्ता असतो ,पण एक रस्ता खडतर असतो आणि तो खूप कमी लोकांनी निवडलेला असतो. हा मार्ग कि तो मार्ग ! एखाद्या मार्गावर गेल्यावर काय होईल ,आपण प्रवास करू शकू की नाही ,हेही माहित नसते आणि मग द्वंद्व संपते !
आणि
तो मार्ग मी निवडतो जो ,खूप कमी लोकांनी निवडलेला आहे, आणि तोच योग्य मार्ग असतो कारण त्यामुळेच जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळते, जीवनाला साफल्य येते.
तुकाराम महाराज यांच्यासमोरही असेच दोन मार्ग होते, पण ते द्वंद्व तुकाराम त्वरित संपवतात . एक मार्ग मोक्षाचा-मुक्तीचा आणि दुसरा जनसेवेचा ,संत संगतीचा ! पण तुकाराम सुद्धा 'less traveled road' निवडतात आणि म्हणतात
न लगे मुक्ती धनसंपदा ,संत संग देई सदा ।
तुका म्हणे गर्भवासी , सुखे घालावे आम्हासी ।।
ज्या मुक्तीसाठी सर्वांचे अध्यात्मिक आसुसलेले असते तो जीवन मुक्तीचा मार्ग नाकारून जनसेवेचा आणि संत सान्निध्याचा अध्यात्मिक अर्थाने खडतर मार्ग ते निवडतात . हेच तत्वज्ञान या कवितेत मांडले आहे. म्हणून ही कविता मला खूप आवडते . कवी Robert Frost या कवितेच्या शेवटी म्हणतो ...........
Two roads diverged in a wood, and I....
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
आपण 'The Road Not Taken' ही कविता जरूर वाचावी आणि तिचे रसग्रहण करावे ,आपल्याला नक्की आवडेल अशी खात्री वाटते .
The Road Not Taken
TWO roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;
Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,
And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I....
I took the one less traveled by,
And that has made all the difference.
Robert Frost .

Comments